Gangwar in flight flying thousands of feet; The passengers panicked
Gangwar in flight flying thousands of feet; The passengers panicked Twitter/ @MayaWilkinsonx
देश विदेश

Video: हजारो फुटांवर विमानातच प्रवाशांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

KLM Airline Fighting Video : क्रोध हा माणसाचा शत्रू असतो असं आपल्याला नेहमी शिकवलं जातं ते उगाच नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे विमानात झालेली मारामारी. (Fight In Flight) होय सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. ज्यात विमान हजारो फूट उंचीवर आहे आणि काही प्रवासी एकमेकांवर तुटून पडले आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल सहा प्रवाशी एकमेकांवर तुटून पडले आहेत. त्यांना रोखण्यासाठी एक क्रु मेंबर त्याठिकाणी आला, पण तोही जास्त काही करु शकला नाही. या गॅंगवॉरमुळे (Gangwar) फ्लाईटमधल्या इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. (Gangwar in flight flying thousands of feet; The passengers panicked)

हे देखील पाहा -

Dutch News ने दिलेल्या माहीतीनुसार ही घटना ब्रिटनमधल मॅचेस्टर इथून नेदरलॅंडच्या एम्सटर्ड येथे जाणारी KLM Airline ची फ्लाईट होती. या फ्लाईटमध्ये असलेल्या प्रवाशांच्या दोन गटांमध्ये कसल्यातरी कारणावरुन बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूचे प्रवासी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत होते. या हाणामारीत एक प्रवासी जखमी झाला. जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा विमान हजारो फूट उंचीवर उडत होतं. सुत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी Schiphol Airport वर पोहोचल्यानंतर हाणामारी करणाऱ्या त्या सहा ब्रिटीश प्रवाशांना ताब्यात घेतलं गेलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

Weightloss Tips: मासिक पाळीनंतर खा हे पदार्थ , वजन होईल कमी

Shubman Gill Statement: गुजरातचं नेमकं चुकतय तरी कुठं? कर्णधार शुभमन गिलने सांगितली पराभवाची कारणं

SCROLL FOR NEXT