आजपासून राज्यात गणपती उत्सव मोठ्ठया प्रमाणात साज़रा केला जात आहे. कोरोनाचे सावट जरी असले तरी भाविकांच्या श्रद्धेने राज्यात ठिकठिकाणी श्रीगणेशाची स्थापना केली जात असताना परदेशात सुद्धा श्रीगणेश विराजमान झाले आहेत. आखाती देशात राज्यातील असंख्य नागरिक वास्तव करीत आहेत, त्यातील मुस्लिम राष्ट्र कुवैतमध्ये सुद्धा आज तेथील सालमिया भागात राहणारे संपदा लेले यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांनी महाराष्ट्र मंडळ कुवेत तैयार केले आहे. त्या मंडळातर्फे दरवर्षी गणपती उत्सव साज़रा केला जात असतो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना असल्याने हा गणपती उत्सव साज़रा करता आला नाही, मात्र यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाले आहे. निर्बंध सुद्धा शिथिल केले असल्याने श्रीगणेश मूर्ति स्थापना करण्यात आली आहे.
राज्याची परंपरा परदेशात सुद्धा पाळल्या जातात त्याचा प्रत्यय आज कुवैत याठिकानी गणपती उत्सव साज़रा करताना आला. या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संपदा लेले यांनी पुढाकार घेऊन मराठी माणसांना एकत्रित करीत महाराष्ट्र मंडळ, कुवैत तैयार करण्यात आले आहे या मंडळाच्या वतीने सर्व हिन्दू धार्मीय सण मोठ्या आनंदाने व उत्सवाने साजरे केले जातात.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.