Indore gambling case Saam tv
देश विदेश

IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर रंगला जुगाराचा डाव; अचानक टाकली धाड, कारवाईत ३ पोलीस कर्मचारी सापडले

madhya pradesh shocking : IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर जुगाराचा डाव रंगला होता. या घरावर पोलिसांनी धाड टाकून १८ जुगारींना ताब्यात घेतलं.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशात फार्महाऊसवर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

छाप्यात १८ जण पोलिसांच्या ताब्यात

६ जण अंधाराचा फायदा घेऊन फरार

आरोपींमध्ये ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर जुगाराचा डाव रंगला होता. पोलिसांनी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीत १८ लोकांना ताब्यात घेतलं. अंधाराचा गैरफायदा घेऊन ६ आरोपींना पळ काढला. या धाडीत पोलिसांनी रोकड, मोबाईल फोन आणि पत्ते आढळून आले. आरोपींमध्ये ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किलोमीटर अंतरावरील अवलिपुरा गावात फार्महाऊस जुगाराचा अड्डा सुरू होता. सूचना मिळताच पोलिसांनी मंगळवार आणि बुधवारच्या रात्री विशेष पथकाने छापा टाकला. छापादरम्यान पोलिसांना फार्महाऊसवर काही जण जुगार खेळताना आढळले.

पोलिसांनी धाड टाकताच ६ जणांनी पळ काढला. पोलिसांना घटास्थळी ३० मोबाईल फोन, पत्ते आणि १३.६८ लाखांची रोकड सापडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथक फार्महाऊसवर पोहोचलं. त्यावेळी मेन गेट बंद होता. तर फार्महाऊसमध्ये जुगाराचा डाव रंगला होता. पोलिसांच्या पथकाने दबक्याने पावलाने फार्महाऊसमध्ये शिरले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल १८ जणांना ताब्यात घेतलं. जगदीश राठोड हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आलं आहे. त्याला फार्महाऊसचा केअरटेकरने मदत केली. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.

कोणाचा आहे फार्महाऊस?

पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, फार्महाऊस हा आयएएस अधिकारी वंदना वैद्य यांच्या मालकीचा आहे. वैद्य या मध्य प्रदेशच्या फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT