PM Narendra Modi Meets Pope Francis Saam Tv
देश विदेश

G7 Summit: पोप फ्रान्सिस यांनी PM मोदींना मारली घट्ट मिठी, G7 देशांना संबोधित करणारे ठरले पहिले पोप

PM Narendra Modi Meets Pope Francis: जी 7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली.

Satish Kengar

इटली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राष्ट्राध्यक्षांसह आज पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली. यादरम्यान पोप फ्रान्सिस यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली. जी 7 देशांना संबोधित करणारे ते पहिले पोप ठरले आहेत.

या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. स्वतः पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली आहे.

पोप फ्रान्सिस यांना निमंत्रण दिल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकांची सेवा आणि जग अधिक चांगलं बनवण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची वचनबद्धतेची मी प्रशंसा करतो. पोप फ्रान्सिस यांनी सात देशांच्या जी 7 गटालाही संबोधित केले. यासह ते जी7 देशांना संबोधित करणारे पहिले पोप ठरले आहेत.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्याबाबत चर्चा केली.

वोलोदिमीर झेलेन्स्की भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधील संघर्ष शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे, असे सांगितले. संवाद आणि मुत्सदेगिरीच्या माध्यमातून संघर्ष सोडवता येईल या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT