वृत्तसंस्था : देशात पेट्रोलियम कंपन्यांनी IOC, HPCL आणि BPCL यानी शनिवारी परत एकदा पेट्रोल, डिझेलच्या भावात वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वर जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनित तेलाचा भाव कमी होऊन भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे भाव कमी केले नाहीत.
हे देखील पहा-
यामुळे पेट्रोलने १२१ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलने ११२ रुपये प्रतिलीटरचा टप्पा ओलांडला आहे. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये आज पेट्रोल १२१.२५ रुपये आणि डिझेल ११२.१५ रुपये प्रति लिटर भावाने विकले जात आहे. याशिवाय मध्य प्रदेशात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल १२० रुपये प्रति लीटर आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे भाव जाहीर करण्यात आले आहे.
यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या भावात अनुक्रमे ३५ आणि ३६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर भाव ११४.७९ रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी १०५.८० रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव अनुक्रमे १०८.९९आणि ९७.७२ रुपये इतका आहे. हे भाव आज दिवसभरासाठी लागू राहणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.