Rising fuel prices push inflation higher, affecting daily life and increasing the burden on common citizens. Saam tv
देश विदेश

पेट्रोल- डिझेल 3 रुपयांनी महागलं, महागाईनं गाठला 42 महिन्यांचा उच्चांक

Petrol-Diesel Prices Rise Common Man Feels the Heat: इंधनाच्या दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडलाय....राज्य़ासह देशात इंधनाचे दर कसे वाढले? या दरवाढीमुळे कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत? सर्वसामान्यांच्या खिशाला कशी कात्री लागणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

महंगाई डायन खाए जात है..." हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल, पण आज याचं गाण्याच्या ओळी सर्वसामान्य माणूस प्रत्यक्षात अनुभवतोय...पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसायला सुरूवात झालीय.. पेट्रोल-डिझेलसह नेमकं काय काय महागलंय ते पाहूया.

महागाईचा भडका

वस्तू दरवाढ

पेट्रोल 3 रुपये

डिझेल 3.11 रुपये

CNG 2 रुपये

दूध 2 रुपये

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे राज्यातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय...गरिबांनी जगायचं कसं?असा सवाल नागरिकांनी केलाय. दरम्यान पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई कशी वाढणार आहे? सर्वसामान्यांना याचा कसा फटका बसणार आहे?इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ होऊन फळे, भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. त्याव्यरितिक्त खाजगी वाहन, ऑटो, टॅक्सी आणि बसने प्रवास करणंही महागणार आहे...डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरनं शेतीची काम करणं महागणार आहे. त्याशिवाय कारखान्यात कच्चा माल पोहोचवण्याचा आणि तयार माल बाजारांपर्यंत नेण्याचा अतिरिक्त खर्च वाढल्यानं औद्योगिक उत्पादनांच्या खर्चातही वाढ होईल...य़ा दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवरही परिणाम मोठा परिणाम होणार आहे.

खरतर या महागाईच्या मागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि देशांतर्गत धोरणं कारणीभूत आहेत. एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाई दराने मागील 42 महिन्यांचा उच्चांक गाठला असून तो थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचलाय. पश्चिम आशियातील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे ही महागाई सामान्यांचा घास हिरावून घेणार असल्याची परिस्थिती निर्माण झालीय...त्यामुळे सरकार या महागाईच्या 'राक्षसाला' नियंत्रणात आणणार की पुढच्या काळात आणखी दरवाढ सामना करावा लागणार याबाबत जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण, उपोषणासाठी मंडप तयार

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT