EPFO  Saam Tv
देश विदेश

EPFO News: फ्रिलान्सरसाठी फायद्याची बातमी! EPFOकडून मिळणार खास सुविधा, वाचा एका क्लिकवर

Freelancers and Gig Workers EPFO Pension: अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या एक कोटीहून अधिक गिग कामगारांना लवकरच ईपीएफओ पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.

Bhagyashree Kamble

विविध क्षेत्रातील ऑनलाइन मंचावर हंगामी तत्त्वावर कार्यरत असणारे तसेच फ्रिलान्सर कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या एक कोटीहून अधिक गिग कामगारांना लवकरच ईपीएफओ पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.

कामगार मंत्रालयाने गिग कामगारांना ईपीएफओ पेन्शन सुविधा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव ७ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे लवकरच फ्रिलान्सर कामगारांनाही पेन्शनचा लाभ मिळेल.

कोणत्याही सामाजिक सुरक्षा कवच किंवा पेन्शनशिवाय काम करणाऱ्या गिग कामगारांना पेन्शन देण्यासाठी, अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांकडून किमान काँट्रीब्यूशन घेतले जाईल. नंतर प्रत्येक बिलिंग व्यवहारातून दोन किंवा तीन टक्के रक्कम पेन्शनसाठी जमा केले जाईल.

गिग कामगारांसाठी एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर जारी केला जाईल. यामध्ये, एका गिग कामगाराला दोन किंवा तीन अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांमध्ये काम करताना एकाच खात्यात सर्व कंपन्यांकडून पेन्शन मिळू शकेल.

गिग कामगारांचे एकच युनिव्हर्सल खाते असेल. त्यांना ईपीएफओकडून किमान पेन्शनची सुविधा निश्चितच मिळेल. परंतु जर दीर्घ सेवा कालावधी अंतर्गत योगदानाची रक्कम किमान पेन्शनपेक्षा जास्त असेल, तर निवृत्तीच्या वेळी त्यानुसार पेन्शन ठरवण्यासाठी दोन पर्याय दिले जाऊ शकतात.

पहिला पर्याय म्हणून, गिग कामगारांना पेन्शन फंडावर मिळणाऱ्या एकूण वार्षिक व्याजाच्या रकमेवर आधारित मासिक पेन्शन मिळू शकते. दुसऱ्या पर्यायात, तो त्याच्या संपूर्ण जमा रकमेवर १० ते ३० वर्षांच्या कालावधीसाठी समान हप्त्यांमध्ये पेन्शन घेऊ शकेल. ईपीएफओच्या पेन्शन नियमांनुसार, पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, गिग वर्करच्या पती/पत्नीला आयुष्यभर ही पेन्शन सुविधा मिळत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT