Budget 2023, Nirmala Sitharaman Speech ANI
देश विदेश

Budget 2023 Updates: केंद्रीय अर्थसंकल्पात गरिबांसाठी मोठी घोषणा; पुढील वर्षभर मिळणार मोफत अन्नधान्य

India Budget 2023: गरिबांना पुढील वर्षभर म्हणजेच १ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

Shivaji Kale

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाचा अर्थसंकल्प संसदेच्या सभागृहात सादर करत आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी गरिबांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. गरिबांना पुढील वर्षभर म्हणजेच १ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करत आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या.

अर्थसंकल्पातील ७ प्राधान्यक्रम यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले. सर्वांच्या सहभागासह विकास (ज्यामध्ये वंचितांसह सर्वांना प्राधान्य दिले जाईल), शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

गरिबांना पुढील एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरिबांसाठी महत्वाची घोषणा केली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, अशी माहिती देतानाच, अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून १.९७ लाख रुपये झाले आहे. या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे, हे देखील त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Recipes : एक रताळे अन् दाण्याचा कूट, उपवासाला झटपट बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

Sukhada Khandkekar : सुखदा खांडकेकरच्या पायाचं ऑपरेशन, २ महिन्यातच रंगभूमीवर ठेवलं पाऊल

राज्यात आज 'ड्राय डे', मद्यपींचे वांदे होणार! २२ हजार हॉटेल-बार आज बंद, सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडणार

SCROLL FOR NEXT