Foxconn Job Saam tv
देश विदेश

Foxconn Investment In Tamilnadu फॉक्सकॉनमुळे हजारो तरुणांना मिळणार नोकरीची संधी, भारतात लवकरच आणणार प्लांट

कोमल दामुद्रे

Foxconn to invest Rs 1600 crore in Tamil Nadu:

फॉक्सकॉन ही सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे. तैवानच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने तामिळनाडूच्या सरकारसोबत करार केला आहे. या करारांतर्गत, कंपनी लवकरच इलेक्ट्रॉनिक घटक तयार करण्यासाठी भारतातील या राज्यात मोठा प्लांट तयार करणार आहे.

यापुढे चीनवर अवलंबून न राहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतासोबत करार केल्यानंतर ६००० हून अधिक रोजगार उपलब्ध होतील. फॉक्सकॉनची उपकंपनी Foxconn Industrial Internet (FII), चेन्नईजवळील कांचीपुरम जिल्ह्यात कॅम्पस तयार करण्यासाठी रुपेय १६ अब्ज गुंतवण्याच्या तयारीत आहे.

व्ही. ली यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी म्हटले वाढदिवसाच्या शुभेच्छा , आदरणीय पंतप्रधान (PM). तुमच्या नेतृत्वाखाली फॉक्सकॉनची भारतात सहज आणि वेगाने वाढ झाली आहे. पुढच्या वर्षी तुमच्या वाढदिवसानिमित्त चांगली भेट देण्यासाठी आम्ही तितक्याच जोमाने कठोर परिश्रम करु, रोजगार दुप्पट करण्याच्या उद्देशाने FDI, आणि भारतातील व्यवसायाला नवीन आकार देण्याचा प्रयत्न करु.

फॉक्सकॉनने (Foxconn) सांगितले की, पुढील दोन वर्षात ५३,००० कामगारांची भरती करण्याची आणि भारतात सुमारे ७०,००० कामगारांची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे.

ऑगस्ट महिन्यात कर्नाटक राज्याने घोषित केले की, फॉक्सकॉन राज्यातील दोन प्रकल्पांमध्ये $600 दशलक्ष गुंतवणूक (Investment) करणार आहे. हे घटक आयफोनसाठी केसिंग घटक आणि चिप उत्पादनासाठी उपकरणे तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

येत्या २०२४ च्या काळात फॉक्सकॉनने तामिळनाडूमधील आयफोन कारखान्यात मोठ्या प्रमाणात नोकरीची भरती सुरु करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT