Who is Mohan Charan Majhi? Saam Tv
देश विदेश

Who is Mohan Charan Majhi: 4 वेळा आमदार, कणखर व खंबीर आदिवासी नेतृत्व; कोण आहेत ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी?

New Odisha CM: भाजप पहिल्यांदाच ओडिशात सत्ता स्थापन करणार आहे. यातच मोहन माझी हे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहे. त्यांच्याच राजकीय प्रवासाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार मोहन चरण माझी हे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बुधवारी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. मोहन माझी हे भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे विद्यमान विधानसभेत मुख्य व्हिप आहेत. ते राज्याच्या केओंझार विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

यावेळी त्यांनी बिजू जनता दलाच्या (बीजेडी) मीना माझी यांचा निवडणुकीत पराभव केला. मोहन माजी यांना 87,815 तर मीना माझी यांना 76,238 मते मिळाली. यातच मोहन यांनी मीना यांचा 11,577 मतांनी पराभव केला.

मोहन माझी यांचा राजकीय प्रवास...

मोहन माझी यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 1997-2000 मध्ये सरपंच म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2000 साली ते पहिल्यांदा राज्याच्या केओंझर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. आतापर्यंत ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2000 ते 2009 या कालावधीत सलग दोन वेळा ते केओंझरमधून आमदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोहन माझी विजयी झाले आणि तिसऱ्यांदा आमदार झाले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून ते चौथ्यांदा केओंझरचे आमदार झाले आहेत.

मोहन माझी यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी विधी शाखेत पदवी मिळवली आहे. त्यांनी 1993 मध्ये सी.एस. कॉलेज चंपुवा येथून बी.ए केले. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी लॉ कॉलेजमधून एलएलबी केले. मोहन माझी हे ओडिशाचे आदिवासी नेते म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, मुख्यमंत्रीपद मिळताच त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे मोहन माझी हे राज्याचे 15 वे मुख्यमंत्री असतील. तसेच राज्यातील सत्ता भाजपकडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT