bank Saam Tv
देश विदेश

बँकेची कामं मार्गी लावा, मे महिन्यात सलग ४ दिवस बँका राहणार बंद

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

मुंबई : एप्रिल महिना लवकरच संपणार असून मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बँकेने (RBI) आधीच जाहीर केल्या आहेत. मे महिन्यात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही सलग सुट्ट्या घेण्याची संधी मिळणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला चार दिवस (bank closed) बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचेही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते त्वरित पूर्ण करा कारण चार दिवस सुट्टी असल्यास (bank holiday) तुमचे काम शिल्लक राहू शकते. मात्र, सुट्टीच्या काळात (online banking) ऑनलाईन बँकिंगच्या सर्व सुविधा उपलब्ध असून त्याचा ग्राहकांना वापर करता येणार आहेत.

1 ते 4 मे पर्यंत सलग सुट्ट्या

आरबीआयने (RBI) जारी केलेल्या कॅलेंडरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ दिवस सुट्ट्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. १ मे रोजी कामगार दिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर १ मेला रविवार असण्यासोबतच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. तसेच २ मे रोजी अनेक राज्यांमध्ये परशुराम जयंतीची सुट्टी असणार आहे. ३ आणि ४ मे रोजी ईद-उल-फितर आणि बसव जयंतीच्या (कर्नाटक) सुट्ट्या असतील. ईदची सुट्टी राज्यानुसार बदलू शकते.

मे महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे पहा

२ मे २०२२: महर्षि परशुराम जयंती, अनेक राज्यांमध्ये सुट्टी

३ मे २०२२: ईद-उल-फितर, बसव जयंती (कर्नाटक)

४ मे २०२२: ईद-उल-फितर, (तेलंगणा)

९ मे २०२२: गुरु रवींद्रनाथ जयंती, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा

१४ मे २०२२: दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी

१६ मे २०२२: बुद्ध पौर्णिमा

२४ मे २०२२: काझी नजरुल इस्लाम जन्मदिवस (सिक्कीम)

२८ मे २०२२: चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

मे २०२२ मध्ये वीकेंड बँक सुट्ट्यांची यादी

१ मे २०२२ : रविवार

८ मे २०२२ : रविवार

१५ मे २०२२ : रविवार

२२ मे २०२२ : रविवार

२९ मे २०२२ : रविवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT