Former Karnataka CM comments on corruption in politics 
देश विदेश

राजकारणात लय भष्ट्राचार झालाय! माजी मुख्यमंत्र्यानं घेतला मोठा निर्णय

Former CM: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजकारणातील वाढत्या भ्रष्टाचाराबद्दलची चिंता व्यक्त करत एक मोठा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

कर्नाटकच्या राजकारणाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राजकारणाबाबत खळबळजक विधान करत एक मोठा निर्णय घेतलाय.माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आता पुढील म्हणजेच २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. याबाबतची माहिती त्यांनी 'एक्स' (X) वरून एका पोस्टद्वारे दिली आहे.

"मी २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही. माझे वय आता ७९ वर्षे आहे. आमच्या सरकारचा कार्यकाळ संपायला अजून दीड वर्ष बाकी आहे. तोपर्यंत मी ८१ किंवा ८२ वर्षांचा असेन. माझी प्रकृती आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. त्यामुळे पूर्वीसारख्याच जिद्दीने आणि उत्साहाने काम करणे आता शक्य नाहीये." अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केलीय. यासह त्यांनी आताच्या राजकारणाबाबत विधान केलंय.

आजचं राजकारण खूप भ्रष्ट झालंय

मंड्या जिल्ह्यातील के.आर. पेट येथे शनिवारी आयोजित एका खासगी कार्यक्रमात सिद्धरामय्या बोलत होते. त्यावेळी त्यांनी जाहीर केलं की, "आज राजकारणात भ्रष्टाचार शिरलाय. त्यामुळे, मी २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही. तरीही, राजकारणात सक्रिय राहून मी लोकांच्या सुख-दुःखात त्यांचा आवाज बनून राहीन."

वरुणा मतदारसंघातील लोक मला वारंवार निवडणूक लढवण्यास आग्रह करत आहेत. परंतु मी निर्धार केला की पुढील निवडणूक लढवणार नाही. "यापूर्वी जेव्हा मी निवडणुका लढवल्या, तेव्हा मतदारसंघातील लोकांनीच निधी पुरवला. त्यांनीच आमच्या विजयाची खात्री केली; मात्र, आज परिस्थिती तशी राहिलेली नाहीये.

आपल्या वयाबाबत बोलातना ते म्हणाले की, मी आता ७९ वर्षांचा झालोय. आमच्या सरकारचे फक्त अडीच वर्ष बाकी राहिलेत. तोपर्यंत माझं वय ८१ ते ८२ वर्ष होईल. माझी प्रकृती तशी नसणार जशी आधी होती.२०२८ सालापर्यंत मी ८२ वर्षांचा असेन. त्यावेळी माझ्या राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण होतील. मी १९७८ मध्ये तालुका बोर्डाचा सदस्य म्हणून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. मी पराभव आणि विजय या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. तरीही, मला या गोष्टीचे समाधान वाटतं की, मी कधीही माझ्या तत्त्वांविरुद्ध वागलो नाही किंवा माझ्या अंतरात्म्याशी कधीही प्रतारणा केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT