FORMER BJP LEADER SHEHZAD POONAWALLA DEMANDS PM MODI'S RESIGNATION? KNOW THE FULL STORY 
देश विदेश

भाजप सोडताच बड्या नेत्यानं मागितला थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा; काय आहे प्रकरण?

Shehzad Poonawalla Tweet Congress: भाजपचे माजी नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस आणि डाव्या-उदारमतवादी गटांवर टीका केली. यासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यामुळे त्यांच्या व्हिडिओची मोठी चर्चा होतेय.

Bharat Jadhav

  • भाजपचा राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावालांचा व्हिडिओ चर्चेत आला.

  • व्हिडिओत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केलीय.

  • 'X' प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Shehzad Poonawalla PM Modi Resignation Tweet: भाजपचा राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागितलाय. आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना शहजाद पुनावाला यांनी डाव्या विचारसरणीच्या लोकांवर आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. काही काळ भाजपचं प्रवक्ते पद सांभाळणाऱ्या शहजाद पुनावला यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागितला हे जाणून घेऊ.

शहजाद पुनावाला यांनी आपल्या कारमधून व्हिडिओ शूट केलाय. हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय. त्यात त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 'डाव्या-उदारमतवादी' (Leftist-liberals) गटावर आणि काँग्रेसवर शरसंधान साधलंय. भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यापासून शहजाद पुनावाला हे चर्चेत आहेत.

पुनावाला यांनी ट्विट करून सांगितले की, डाव्या विचारसरणीच्या उदारमतवाद्यांनी त्यांना पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या मोहिमेत सहभागी होण्यास वारंवार सांगित होते, परंतु त्यांनी त्याला नकार दिला. याचबरोबर त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा का मागितला राजीनामा

"पंतप्रधान महोदय, कृपया राजीनामा द्या; कारण तुम्ही इंदिराजींचा नातू बनण्यात अपयशी ठरला आहात."भाजप सोडल्यापासून पूनावाला सोशल मीडियावर सातत्याने विरोधी पक्षावर टीका करत आहेत. त्यांनी विशेषतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलंय . याच व्हिडिओ पंतप्रधानांच्या राजीनाम्याची उपरोधिक मागणी करताना त्यांनी ज्या व्हिडिओचा संदर्भ दिला होता, त्यातच त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींचे वर्णन वारंवार 'हुकूमशहा' असे केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

SCROLL FOR NEXT