Stray Dogs News Saam TV
देश विदेश

Stray Dogs News : भटके कुत्रे घातक, माणसांच्या सुरक्षेची काळजी घेणे जास्त गरजेचे...; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

High Court News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जर एखाद्या व्यक्तीला खरोखर प्राण्यांबाबत प्रेम असेल तर त्यांनी सर्व अटी पूर्ण करून लायसन्स मिळवावे.

Ruchika Jadhav

Kerala News :

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील मुजहथदाम वॉर्डमध्ये राहणारे राजीव कृष्णन प्राणी प्रेमी आहेत. परिसरातील भटके कुत्रे, प्राणी यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. मात्र भटके कुत्रे घातक असून त्यापेक्षा माणसांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे असं न्यायालयाने म्हटलं आहे.

मुजहथदाम ज्या ठिकाणी राहतात तेथे परिसरात फार वर्दळ आहे. नागरिकांची घरे फार दाटीवाटीने आहेत. अशात येथे असलेल्या भटक्या कुत्र्यांना मुजहथदाम रोज जेवण देतात. एखादा कुत्रा आजारी असेल तर त्याच्यावर उपचार करताता. त्याला घरी घेऊन येतात. मात्र याच परिसरातील अन्य नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कोर्टाने त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सामान्य माणसांच्या दृष्टीने टिप्पणी केली आहे.

लाईव्ह लॉवर याबाबत बातमी देण्यात आली आहे. कोर्टाने टिप्पनीत म्हटलं आहे की, कुत्र्यांची आवड असलेल्या व्यक्तीने पशू जन्म नियंत्रण नियम आणि केरळ नगरपालिका अधिनियम नुसार कुत्रे पाळण्यासाठी त्या व्यक्तीकडे लाइन्सस असणे गरजेचे आहे. कोणत्याही पशूप्रेमी व्यक्तीने भटक्या कुत्र्यांविषयी भावना व्यक्त करताना सोशल मीडियावर भले मोठे लेख लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा आपल्या कुत्र्यांची सुरक्षा कशी घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जर एखाद्या व्यक्तीला खरोखर प्राण्यांबाबत प्रेम असेल तर त्यांनी सर्व अटी पूर्ण करून लायसन्स मिळवावे. भटक्या कुत्र्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. कुत्रे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध अशा सर्वांवरच हल्ला करतात. कुत्र्यांमुळे लहान मुलं घराबाहेर पडण्यास घाबरतात.

सकाळी शाळेत जाताना रस्त्याला जास्त माणसे नसतात त्यामुळे अशा वेळी एकट्याने प्रवास करण्यासाठी सर्वांनाच भीती वाटते. एकटी व्यक्ती असल्यास कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात. अशा हल्ल्यांपासून सर्वांचे संरक्षण व्हावे यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. माणसांच्या जिवाची काळजी केली पाहिजे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT