Tamilnadu hospital fire news update  ANI
देश विदेश

Tamil Nadu Hospital Fire : खासगी रुग्णालयात भीषण आग ; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 20 जण जखमी

Tamil Nadu hospital fire update : तामिळनाडू येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत एका लहान मुलासह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20 जण भाजले आहेत.

Nandkumar Joshi

तामिळनाडूतील दिंडीगुल येथील एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तळमजल्यावर रिसेप्शन जवळ ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

धुराचे लोट इतर मजल्यांवर प्रचंड वेगाने पसरले. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, रुग्णालयच्या संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयातील इतर रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रचंड गोंधळ उडाला

दिंडीगुल येथील खासगी रुग्णालयात शॉर्ट्सर्किटमुळे आग लागली. सगळीकडे धुराचे लोट पसरले. अचानक आग लागल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. अगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT