Girls Fight Video Saam Tv
देश विदेश

Girls Fight Video : एका बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी आपसांत भिडल्या; भर हॉटेलात WWE चा थरार, तरुणालाही दिला चोप

हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल

Shivani Tichkule

Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो.काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो.

अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन तरुणी हाणामारी करताना दिसत आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ गोरखपूर येथील आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. एका बॉयफ्रेंडवरून ही हाणामारी झाल्याचं बोललं जातंय.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एसएसपी निवासस्थानासमोरील एका रेस्टॉरंटमध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. तब्बल २० मिनिटापर्यंत दोन ते तीन तरूणींकडून एका तरूणीला काठीने आणि केसाला धरून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सुरक्षासक्षकाच्या हस्तक्षेपानंतर अखेर तरूणीची सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (viral Video) होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुली एकमेकींवर लाठ्या-काठ्यांचा वर्षाव करत आहे इतकंच नाही तर त्या एकमेकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यानंतर काही तरूणीने एका तरूणालाही मारल्याचं व्हिडिओत दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी (police) कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT