Farsa Wale Baba  Saam tv
देश विदेश

'फरसा वाला बाबा'ची हत्या? गो तस्करांनी ट्रकने उडवल्याचा आरोप, समर्थकांनी हायवे अडवला

farsa wale baba killing case : मथुरामध्ये 'फरसा वाला बाबा'ची हत्या करण्यात आली आहे. गो-तस्करांनी ट्रकने उडवल्यानंतर 'फरसा वाला बाबा'चा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Vishal Gangurde

गोरक्षक ‘फरसा वाला बाबा’ यांची हत्या केल्याचा आरोप

गो-तस्करांनी ट्रकने उडवल्याचा आरोप

संतप्त समर्थकांनी महामार्ग अडवला

उत्तर प्रदेशच्या मथुरा पोलीस स्टेशनच्या नवीपूर गावांत गोरक्षक चंद्रशेखर उर्फ फरसा वाला बाबांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ४५ वर्षीय 'फरसा वाला बाबां'च्या हत्येने शुक्रवारी परिसरात खळबळ उडाली आहे. समर्थकांनी दिल्ली-आग्रा महामार्ग अडवला. त्यानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली.

'NDTV'च्या रिपोर्टनुसार, 'फरसा वाला बाबांच्या हत्येची घटना शनिवारी सकाळी ४ वाजता घडली. फरसा वाला बाबा सकाळच्या सुमारास गो-तस्करांचा पाठलाग करत होते. त्याचवेळी गो-तस्करांनी त्यांना ट्रकने उडवलं. या घटनेत फरसा वाला बाबा यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.

फरसा वाला बाबा यांच्या मृत्यूनंतर समर्थकांनी गो-तस्करांना पकडून पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलं. तर घटनेनंतर तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी तिघांचा तपास सुरू केला आहे.

फरसा वाला बाबा यांच्या हत्येची माहिती गावभर पसरल्यानंतर मोठ्या संख्येने गौरक्षक आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर वातावरण तापल्यानंतर लोकांची संख्या आणखी वाढली. त्यांनी थेट महामार्ग अडवला. या आंदोलकांनी यावेळी आरोपींच्या अटकेची मागणी केली.

फरसा वाला बाबा यांच्या मृत्यूने समर्थकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. फरसा वाला बाबा हे गौरक्षा आंदोलनाचे प्रमुख नेते होते. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही तास समजूत काढल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS प्रकरणातील निदा खानला जामीन, न्यायालयानं दिला 'श्रीकृष्णाचा' दाखला, कोर्टात नेमकं काय झालं?

High Cholesterol: या 6 सोप्या टीप्स शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतील नियंत्रणात; हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन, राज्यात ATSची एकाचवेळी १५० ठिकाणी छापेमारी, ६ जण ताब्यात

Maharashtra News Live Update: जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही

गावरान स्टाईलची चिचुर्ड्याची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? एकदम सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT