Delhi Chalo March  Saam tv
देश विदेश

Delhi Chalo March : शेतकरी पुन्हा आक्रमक, ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून, काय आहेत प्रमुख मागण्या?

Delhi Chalo March update : शंभू बॉर्डरवर शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्यास तयारी केली आहे. यामुळे सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कुच केली आहे. १०१ शेतकऱ्यांनी पायी चालत बॉर्डरवरून अंबालाकडे २ बॅरिकेड्स ओलांडले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना हरियाणा पोलीस आणि निमष्करी दलाच्या बॅरिकेडवर थांबवण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना अडवण्यासाठी लावण्यासाठी आलेल्या काटेरी तारा शेतकऱ्यांनी तोडल्या आहेत. हरियाणा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ७ शेतकरी जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. हमीभाव ते कर्जमाफीच्या मुद्द्यांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत :

शेतकऱ्यांच्या सर्व शेत मालाला हमीभाव देणारा कायदा करावा

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

शेतकरी आणि शेतमंजूरांची कर्जमाफी करावी

भूमीअधिग्रहन कायदा २०१३ पुन्हा एकदा लागू करण्यात यावा

लखीमपूर खिरी इथल्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा

वीज विधेयक २००० रद्द करण्यात यावे

मसाल्याच्या पदार्थासाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली जावी.

संविधानाची ५ वी सूची लागू करून आदिवासींच्या जमीनीची लूट थांबवण्यात यावी

खोटे बियाणे, कीटकनाशक, खते तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांची आहे.

अंबालामध्ये इंटरनेट सेवा बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या अंबाला येथे ९ डिसेंबरपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. सरकारने हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भागात मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे.

एका आदेशानुसार, ६ डिसेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हा आदेश हरियाणा सरकारने जारी केला आहे. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. किमान हमीभावाचा कायदा लागू करावा, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ManoJ Jarange Patil : एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगेंची आंदोलकांना साद

Eknath Shinde: आरक्षण कोणामुळे गेलं? माहिती घेऊन बोला; एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Maratha Reservation : तोडगा निघणार? मुंबईत मनोज जरांगेंचं उपोषण, उपसमितीच्या बैठकीत ५० मिनिटं चर्चा; शिंदे,पवार रवाना

BB19 Weekend Ka Vaar: सलमान खानने केली कुनिका-गौरवची पोलखोल; प्रणित मोरेला शिकवली अद्दल,पाहा या विकेंड वारमध्ये काय घडले

Manoj Jarange Patil Protest Live Updates: नीरा लोणंदमध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते समोरासमोर

SCROLL FOR NEXT