X Accounts Suspended Saam Tv
देश विदेश

X Accounts Suspended : 'सरकारचा आदेश मान्य पण सहमत नाही', शेतकरी आंदोलनासंबंधित अनेक X अकाऊंट्स बॅन

Farmer Protest Accounts Suspended By X: भारत सरकारने अलीकडेच X वरून काही खाती ब्लॉक करण्याचे आदेश एक्स कंपनीला दिले होते. एक्सने सरकारचा हा आदेश मान्य केला आहे, पण सहमत नसल्याचंही सांगितलं आहे.

प्रविण वाकचौरे

X Accounts Suspended :

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अकाउंट्स सोशल मीडिया प्लटफॉर्म X ने बंद केले आहेत. शेतकरी आंदोलनासंबंधीचे अकाऊंट्स आणि फॅन पेजेसवर ही कारवाई करण्यात आली आहे. इलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीने सरकारच्या आदेशाचे पालन केले असले तरी याच्याशी आपण सहमन नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत सरकारने अलीकडेच X वरून काही खाती ब्लॉक करण्याचे आदेश कंपनीला दिले होते. एक्सने सरकारचा हा आदेश मान्य केला आहे, पण सहमत नसल्याचंही सांगितलं आहे. X ने म्हटलं की, भारत सरकारच्या आदेशानंतर काही X खाती ब्लॉक किंवा सस्पेंड करण्यात आली आहेत. परंतु आम्ही याच्याशी सहमत नाही. लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. (Latest Marathi News)

भारत सरकारने काही ठराविक खात्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि ही खाती आणि पोस्ट केवळ भारतातच बॅन केल्या जातील.आम्ही या कृतीशी सहमत नाही, असंही एक्सने म्हटलं आहे.

भारत सरकार सामाजिक सलोखा बिघडू शकेल असे वादग्रस्त अकाऊंट किंवा सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश देते. या संदर्भात, X ला जास्तीत जास्त आदेश मिळतात.

गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 14 आणि 19 फेब्रुवारी रोजी आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत आदेश जारी केले. गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 177 सोशल मीडिया खाती आणि वेब लिंक्स तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सरकारचे दोन्ही आदेश शेतकरी आंदोलनाच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनानंतर ही खाती पुन्हा सुरु केली जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT