Faridabad Tragedy Saam Tv
देश विदेश

Faridabad Tragedy: झाडांना पाणी घालताना घात झाला; १४व्या मजल्याचा स्लॅप कोसळून SBIच्या मॅनेजरचा मृत्यू

Faridabad News : स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झालेले ६६ वर्षीय कुलवंत सिंग मंगळवारी सकाळच्या सुमारास झाडांना पाणी घालत असताना इमारतीचा स्लॅब कोसळून सिंग १४व्या मजल्यावरून खाली पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फरिदाबाद : कुंडीतील रोपांना पाणी देताना एका ६६ वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापकाचा १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झालेले ६६ वर्षीय कुलवंत सिंग त्यांच्या मुलासह सवाना या सोसायटी मध्ये राहत होते. सिंग मंगळवारी (दि २४) सकाळी ८च्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या निवासी इमारतीमधील १४व्या मजल्यावरील स्कायवॉकवर असलेल्या रोपांना पाणी घालत असताना इमारतीचा स्लॅब कोसळला आणि सिंग १४व्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेनंतर सिंग यांना हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तथापि, सोसायटीतील काही रहिवाशांनी सांगितले की सोसायटीमध्ये बांधलेले सर्व स्कायवॉक पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. याबाबत एका आठवड्यापूर्वी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन (RWA) कडे तक्रार करण्यात आली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT