Rahul Gandhi Targets EC Over Bogus Voters saam tv
देश विदेश

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi Targets EC Over Bogus Voters: कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात बनावट मतदार असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. मतदारांचा डिजिटल डेटा द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केलीय. राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्याकडे पुरावे मागितले आहेत.

Suprim Maskar

  • राहुल गांधींनी महादेवपुरा मतदारसंघात 1.25 लाख बोगस मतदार असल्याचा आरोप केला.

  • निवडणूक आयोगाने या आरोपांवर पुरावे सादर करण्यासाठी राहुल गांधींना शपथपत्र पाठवलं.

  • राहुल गांधींनी आयोगाकडे डिजिटल मतदार डेटाची मागणी करत EC ला अडचणीत आणलं.

  • मोदींवर टीका करत राहुल गांधींनी निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाला चांगलंच घेरलंय.. तर आयोगानेही राहुल गांधींना शपथपत्र पाठवलंय. त्यावरुन आता नवं रणकंदन सुरुय. राहुल गांधींच्या आरोपांचा काय परिणाम होऊ शकतो? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. निवडणुकीतील मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी सुरु केलेला आरोपांचा सिलसिला दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे.. कर्नाटकच्या महादेवपुरा लोकसभा मतदारसंघातील 1 लाख 250 बोगस मतदारांसंदर्भातील आरोपांवरुन निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्र पाठवून पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. तर मोदींवर निशाणा साधत राहुल गांधींनी डिजिटल डेटाची मागणी करुन निवडणूक आयोगाला आणखीच कात्रीत पकडलंय.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 1 कोटी मतदारांची वाढ झाली. तर अखेरच्या 1 तासात राज्यात तब्बल 76 लाख मतदार वाढल्याचं समोर आलं. या आकडेवारीवर संशय व्यक्त करत कॉंग्रेसनं शोध घ्यायला सुरवात केली..आणि या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच राहुल गांधींनी उघड केलीय. निवडणूक आयोगाने शपथपत्राचं आव्हान दिल्यानंतर राहुल गांधींनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केलीय.

राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील घोटाळा उघड केलाय खरा.. मात्र यामुळे निवडणुक आयोगाच्या हाती आयतं कोलित मिळाल्याने बिहारच्या निवडणूकीत विरोधक बॅकफुटवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. बनावट मतदार, चुकीचा पत्ता, नकली फोटो,तसंच एकाच पत्त्यावर अनेक बोगस मतदार असल्याचं राहुल गांधींनी दाखवून दिलंय.राहुल गांधीच्या या आरोपानं एकच राळ उडवून दिलीय. या प्रकरणी निवडणूक आयोग राहुल गांधींना डिजिटल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज देऊन शंकेचं निरसन करणार की केवळ पुरावे सादर करण्यास सांगून याकडे दुर्लक्ष करणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT