uttar pradesh crime news  Saam tv
देश विदेश

'उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून आलोय'; गोदामात शिरून ४ सिलिंडर घेऊन गेले; एजन्सी कर्मचाऱ्यांच्या तपासानंतर धक्कादायक माहिती उघड

uttar pradesh crime news : उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने गोदामात शिरून ४ सिलिंडर घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. एजन्सी कर्मचाऱ्यांच्या तपासानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Gangurde

गॅस एजन्सीच्या सिलिंडरच्या गोदामात बोगस अधिकाऱ्यांनी केला प्रवेश केला

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलो असल्याचे सांगितले

एजन्सीच्या गोदामातून ४ एलपीजी सिलिंडर घेऊन फरार

उत्तर प्रदेशच्या राजधानीत पटनामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नावाने सिलिंडर लंपास केल्याचे समोर आलं आहे. काही लोकांनी सरकारी अधिकारी असल्याचे बतावणी करत गॅस एजन्सीच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर एजन्सीतून ४ एलपीजी सिलिंडर घेऊन गेले. यानंतर एजन्सीने उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पटनाच्या गर्दनीबाग भागात गुरुवारी गॅस एजन्सीमध्ये काही लोक पोहोचले. त्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या कार्यालयातून आल्याचे सांगितले. त्यांनी एजन्सी कर्मचाऱ्याकडे १५ गॅस सिलिंडरची मागणी केली.

बोगस अधिकाऱ्यांनी गोदामातील सिलिंडरची पाहणी करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांना ४ गॅस सिलिंडर आढळले. त्यानंतर त्यांनी ४ सिलिंडर घेऊन गेले. बोगस अधिकाऱ्यांनी व्हीव्हीआयपी असून आम्हाला रांग लावायची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ४ सिलिंडर घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या कार्यालयाने बोगस अधिकाऱ्यांशी संबंध नसल्याचे स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव शैलेंद्र ओझा यांनी म्हटलं की, उपमुख्यमंत्री कार्यालयातील कोणत्याही कर्मचारी गॅस एजन्सीच्या कार्यालयात एलपीजी सिलिंडर आणण्यास गेला नव्हता. गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्यांचा आमच्या कार्यालयाशी संबंध नाही'.

'उपमुख्यमंत्री कार्यालयात 'सब डिव्हिजनल ऑफिसर' असे पद अस्तित्वात नाही. कार्यालयाने गॅस एजन्सीने सिलिंडरची मागणी केली नव्हती. एजन्सीची फसवणूक झाली आहे,असे अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने कोणतेही प्रकारची सिलिंडर मागितले नव्हते, असे स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच कार्यालयातूनही कोणाला सिलिंडर घ्यायला पाठवलं नव्हतं, असे सांगण्यात आलं. आता या प्रकरणात तपासानंतर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

शनिवार ठरला घातवार, नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT