India Pakistan conflict Saam tv
देश विदेश

Fact Check : पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

India Pakistan conflict viral rafale photo : भारत-पाकिस्तान युद्धावेळी पाकिस्तानने भारताचं राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय...पाकिस्तानकडून हा फोटो व्हायरल करण्यात आलाय...त्यामुळे खरंच भारताचं राफेल पाकने पाडलं का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

एक फोटो व्हायरल करून पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा केलाय...राफेल कोसळल्याचा हा फोटो खरा आहे का? ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात राफेल पडलं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'भारत-पाक हल्ल्यादरम्यान पाकिस्तानने भारताचं राफेल पाडलं. राफेल पाडल्याचे फोटो पुरावा म्हणून देण्यात आलाय'.

हा मेसेज आणि राफेल क्रॅश झाल्याचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय...त्यामुळे अनेकांना हा फोटो खरा असल्याचं वाटू लागलंय...सध्या भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला घाम फोडला...त्यामुळे 3 दिवसांतच पाकिस्तान गुडघ्यावर येत भारताकडे शस्त्रसंधीची मागणी केली...आणि आता शस्त्रसंधी केल्यानंतर भारताच्या विरोधात फोटो व्हायरल केले जातायत...त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य ?

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकनं राफेल पाडलेलं नाही

भारताचं कोणतंही फायटर जेट उद्ध्वस्त झालं नाही

पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा खोटा

MiG-21 क्रॅश झाल्याचा जुना फोटो व्हायरल

हल्ल्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवल्याने पाक सैरभैर झालंय...पाकिस्तानकडून भारताविरोधात चुकीची माहिती पसरवली जातेय...आता हे राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, हा व्हायरल फोटो 2021 सालातील आहे...पंजाबच्या मोगा जिल्ह्यात भारतीय वायू सेनेचं MiG-21 जेट क्रॅश झालं होतं...त्यावेळीचा फोटो आता व्हायरल करून भारताची बदनामीचा डाव पाकिस्तानने आखलाय...आमच्या पडताळणीत पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing: 'पुढच्या वेळी, छातीवर गोळी...'; रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कोणी घेतली?

NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण? प्रफुल्ल पटेलांचं नाव घेणारे पियुष गोयल यांची दिलगिरी; म्हणाले, दिशाभूल...

Maharashtra Live News Update: बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त - बच्चू कडू

Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...

भाजपच्या सभेवेळी शिंदेसेनेच्या प्रचाराची गाडी गेली, आमदार पडळकर समर्थकांनी फोडली; निवडणुकीत राडा

SCROLL FOR NEXT