EXPLAINER Manipur Violence  SAAM TV
देश विदेश

EXPLAINER: मणिपूरमध्ये का भडकला हिंसाचार? मैतेई का करत आहेत आदिवासी दर्जाची मागणी?

Chandrakant Jagtap

Why Violence Broke Out In Manipur: गेल्या 54 दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मैतेईंना आदिवासीचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात मोर्चा काढण्यात आला आणि याच मोर्चात झालेल्या वादानंतर (Why Manipur Is Burning) राज्यात हिंसाचाराला सुरुवात झाली.

ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूरने (ATSUM) 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढला. हा मोर्चा चर्चंदपूरच्या तोरबांग परिसरात काढण्यात आला. या रॅलीदरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसक हाणामारी झाली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

याच दिवशी हिंसाचार प्रचंड भडकला आणि संध्याकाळपर्यंत परिस्थिती इतकी बिघडली की राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली. नंतर तेथे लष्कर आणि निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या. मे महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये उसळलेल्या या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मैतेईंच्या मागणीविरोधात काढला मोर्चा

मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात ही रॅली काढण्यात आली होती. अनुसूचित जमातीचा म्हणजेच एसटीचा दर्जा मिळावा अशी मागणी मैतेई समाज अनेक दिवसांपासून करत आहे.

हायकोर्टाचे सरकारला विचार करण्याचे निर्देश

गेल्या महिन्यात मणिपूर उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश एमव्ही मुरलीधरन यांनी एक आदेश दिला होता. त्यात राज्य सरकारला मेईतेई समाजाला जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करण्यास सांगण्यात आले. यासाठी उच्च न्यायालयाने सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. मणिपूर उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर नागा आणि कुकी जमातीचे समुदाय संतप्त झाले होते. त्यानंतर ३ मे रोजी त्यांनी आदिवासी एकता पदयात्रा काढली. (Marathi Tajya Batmya)

मैतेई आदिवासी दर्जाची मागणी का करत आहेत?

मणिपूरमध्ये मैतेई समुदायाची लोकसंख्या ५३ टक्क्यांहून अधिक आहे. हे गैर-आदिवासी समुदाय आहेत, यात बहुसंख्य लोक हिंदू आहेत. दुसरीकडे कुकी आणि नागा यांची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे. राज्यात एवढी मोठी लोकसंख्या असूनही मैतेई समाज केवळ घाटीतच स्थायिक होऊ शकतो. मणिपूरचा ९० टक्क्यांहून अधिक भाग डोंगराळ आहे आणि केवळ 10 टक्के भाग घाटी आहे. डोंगराळ भागात नागा आणि कुकी समुदाय आणि घाटीत मैतेई यांचे वर्चस्व आहे. (Latest Political News)

मणिपूरमधील कायद्यात वादाचं कारण?

मणिपूरमध्ये असलेल्या एका कायद्याअंतर्गत घाटीत स्थायिक असलेले मैतेई समुदायाचे लोक डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकत आणि जमीनही खरेदी करू शकत नाहीत. मात्र डोंगराळ भागात स्थायिक असलेले कुकी आणि नागा आदिवासी समुदाय घाटीत जमीन खरेदी करू शकतात आणि स्थायिकही होऊ शकतात. एकंदरीतच 53 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या फक्त 10 टक्के भागात राहू शकते, तर 40 टक्के लोकसंख्या 90 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर वर्चस्व गाजवते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT