america israel–Iran war effect Saam tv
देश विदेश

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

america israel–Iran war effect : अमेरिका-इराण युद्धाची झळ घरगुती गॅससह अनेक उद्योगांना बसतेय. आता तुमच्या जीवनाची गरज बनलेलं इंटरनेटही ठप्प होण्याचा धोका आहे. हे नेमकं कशामुळे होणार आहे? समुद्राखाली इंटरनेटचं जग कसं लपलेलं आहे पाहूया एक रिपोर्ट....

Girish Nikam

होर्मुझमार्गे होणारी जलवाहतूक जगातील तेलाची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. मात्र हा जलमार्ग केवळ तेलाच्या व्यापारासाठी नाही तर जगातील इंटरनेटसाठी एक महत्त्वाचा डिजिटल कॉरिडॉर देखील आहे. याच्या तळाशी फायबर-ऑप्टिक केबल्सचे प्रचंड मोठे जाळे आहे. भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्याने अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपमधून येणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे. या केबल्सचा मोठा भाग होर्मुझमधून जातो. भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रफिकपैकी सुमारे एक तृतीयांश या क्षेत्रात आहे. जर समुद्रातही हल्ले सुरू झाले तर या केबल्सवर संकट ओढवू शकतं. यामुळे नेमका कशावर परिणाम होऊ शकतो ? ते पाहूया

ई-मेल

ऑनलाइन बँकिंग

सोशल मीडिया

व्हिडीओ कॉल

स्ट्रीमिंग सेवा

क्लाउड कम्प्युटिंग

डिजिटल ऑपरेशन्स

गेल्या काही वर्षांत मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेमध्ये गुंतवणूक केली आहे. Amazon, Google आणि Microsoft सारख्या कंपन्या तेथे डेटा सेंटर आणि AI पायाभूत सुविधा उभारत आहेत. या डेटा सेंटर्सना जगाशी जोडणाऱ्या अनेक केबल्स होर्मुझ परिसरातून जातात. तज्ञांचं यासंदर्भात काय म्हणणं आहे ते पाहूया...

समुद्राखाली टाकलेल्या हजारो किलोमीटरच्या फायबर-ऑप्टिक केबल्स जगातील इंटरनेटचा खरा कणा आहेत. तज्ञांच्या मते, जगातील सुमारे 95 ते 99 टक्के आंतरराष्ट्रीय डेटा ट्रॅफिक या समुद्राखालील केबल्समधून होत असतं.

समुद्राखाली लपलेले इंटरनेटचे जग

आज जगात 400 हून अधिक प्रमुख इंटरनेट केबल नेटवर्क आहेत. ही केबल समुद्राच्या तळापासूनही काही मीटर खाली अंथरलेली आहे. ही केबल प्रकाशाच्या वेगाने डेटा प्रसारित करते. आणि आखाती देशांच्या समुद्रातून जाणारं हे इंटरनेटचं महाजाल आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडतात.

म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी आता केवळ तेलासाठीच नव्हे तर इंटरनेटसाठी देखील एक महत्त्वाचा परिसर मानला जोता. त्यामुळे युद्ध चिघळलं आणि ते थेट समुद्रात पोहचलं तर मात्र जगाचंच इंटनेट ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT