देश विदेश

Explainer: राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करता येते? कोणत्या नियमातून होते कारवाई

Bharat Jadhav

Explainer Chief Minister Arresting Rules :

दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. आज ईडीच्या पथकाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराची तपासणाी केली. त्यानंतर केजरीवाल यांना प्रश्न करत त्यांची चौकशी केली.त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पण एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करता येते का? अटक होते तर कोणत्या नियमानुसार अटक होत असते? या प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून घेऊ(Latest News)

दरम्यान देशातील कोणत्याच मुख्यमंत्र्याला पदावर असताना अटक झालेली नाही. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात मात्र ते पदावर असताना त्यांना अटक करण्यात आलीय. अशी कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी वेगळे नियम आणि कायदे आहेत.आम्ही तुम्हाला सांगतो की पदावर असताना, राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल कारवाईपासून मुक्त आहेत.

या मुख्यमंत्र्यांना झाली अटक

दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या आधी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात जावे लागले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक झालीय. ३१जानेवारी २०२४ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. हेमंत सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीच्या ८ तासांच्या चौकशीनंतर सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

लालू प्रसाद यादव

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनाही अटक करण्यात आली होती. ३० जुलै १९९६ रोजी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. यापूर्वी २५ जुलै १९९६ रोजी पाटणाच्या विशेष न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. यानंतर लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

उमा भारती

उमा भारती यांना २००४ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. अटकेपूर्वी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर १५ ऑगस्ट १९९४ रोजी कर्नाटकातील हुबळी शहरातील मशिदीवर झेंडा फडकावल्याचा आरोप होता.

जे जयललिता

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता १९९१ ते २०१६ दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री होत्या.१९९६ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही अटक करण्यात आली आहे. कौशल्य विकास घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

ओम प्रकाश चौटाला

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनाही अटक करण्यात आलीय. तेव्हा ते मुख्यमंत्रीही नव्हते. माजी मुख्यमंत्री चौटाला यांना २०१३ मध्ये शिक्षक भरती प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बीएस येडियुरप्पा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही २०११ मध्ये जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. अटक झाली होती त्याच्या आधी दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

कोणत्या नियमानुसार होते अटक

  • सामान्य माणसाप्रमाणे मुख्यमंत्र्यांना अटक होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या अटकेबाबत सिव्हिल प्रोसिजर संहितेत स्वतंत्र नियम आणि कायदे आहेत.

  • नागरी प्रक्रिया संहिता (कोड ऑफ सिविल प्रोसीजर) १३५ अन्वये कोणत्याही मुख्यमंत्र्यांना केवळ विधिमंडळ प्रकरणांमध्ये अटकेपासून मुक्ती मिळते.

  • मुख्यमंत्र्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास त्यांना अटकेपासून मुक्ती मिळत नाही. तपास यंत्रणा त्या मुख्यमंत्र्यांना अटक करू शकते.

  • कोणत्याही मुख्यमंत्र्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्यांना दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकरणात अटक होऊ शकते.

  • कलम १३५ अंतर्गत कोणत्याही मुख्यमंत्र्यांना सभागृहातून अटक करता येत नाही. तसेच विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या ४० दिवस आधी आणि ते संपल्यानंतर ४० दिवसांपर्यंत मुख्यमंत्र्यांना अटक करता येत नाही.

  • कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करायची असेल तर आधी सभागृहाच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते.

  • विधानसभा अध्यक्षांची मंजुरी मिळाल्यानंतरच पोलीस किंवा तपास यंत्रणा मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT