ISRO News Saam Tv
देश विदेश

ISRO News: इस्रोमधून रॉकेटमधील चीप सॉफ्टवेअर चोरण्याचा प्रयत्न; रोज होतायत १०० पेक्षा जास्त सायबर हल्ले

Bharat Jadhav

Cyber Attack On ISRO:

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सॉफ्टवेअरवर दररोज १०० पेक्षा जास्त सायबर हल्ले होत आहेत. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याविषयीची माहिती दिलीय. ते केरळच्या कोचीमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेत बोलत होते. (Latest News)

रॉकेटच्या तंत्रज्ञानात सायबर हल्ला होण्याची दाट शक्यता असते. यात आधुनिक सॉफ्टवेअर आणि चीपचा वापर केला जातो. परंतु हा धोका किती का मोठा असे ना इस्रो या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यास आणि संपूर्ण यंत्रणा सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. आपली यंत्रणा सायबर सुरक्षा नेटवर्कनं सज्ज आहे. यामुळे कोणताच सायबर हल्ला या यंत्रणेत बिघाड करू शकत नाही. याचबरोबर तंत्रज्ञानात बदल होत आहेत. आपल्यालाही अपडेट व्हावे लागेल,, असं एस. सोमनाथ यावेळी म्हणाले.

संस्थेनं रॉकेटमध्ये हार्डवेअर चीप बसवलीय. त्याच्या सुरक्षेवर इस्रो आपला लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चाचणी केली जातेय. आम्ही सॅटेलाईटवर नजर ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करत होतो. आता अनेक सॅटेलाईटमध्ये चीप बसवण्यात येत आहे. यामुळे तंत्रज्ञान बदलत आहे. यामुळे आपल्यालाही बदलावे लागेल. यात अनेक सॅटेलाईट आहेत, जे सामान्य लोकांच्या जीवनासाठी उपयुक्त आहेत.

ISRO

या सगळ्यांना वेगवेगळ्या सॉफ्टवेअरनं नियंत्रित केलं जातं. यामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा खूप महत्त्वाची असल्याचं एस.सोमनाथ म्हणाले. सायबर हल्ल्यांबद्दल सोमनाथ पुढे म्हणाले, प्रगत तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान आणि धोकाही आहे. आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखे तंत्रज्ञानाची मदत घेऊन सायबर क्राईमच्या आव्हानांचा सामना करू शकतो. यासाठी सर्वोत्तम संशोधन आणि मोठे कष्ट करावे लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT