Fire  Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh News: एकत्र शाळा, एकाच दिवशी लग्न अन् एकत्रच जग सोडलं, मित्राच्या जळत्या चितेवर उडी घेत संपवलं जीवन

Uttar Pradesh News: 90 टक्के भाजलेल्या उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

UP News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिवलग मित्राच्या मृत्यूनंतर दुखावलेल्या मित्राने जळत्या चितेवर उडी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मित्राच्या जळत्या चितेवर उडी घेतल्यानंतर तरुणानेही पेट घेतला आणि तो गंभीररित्या भाजला. उपस्थित नागरिकांना तातडीने त्याला चितेतून बाहेर काढलं आणि त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयामध्ये दाखल केलं. तेथून त्याला उपचारासाठी आग्रा येथे आणण्यात आले. मात्र 90 टक्के भाजलेल्या उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, पोलिसांनी सांगितले की, अशोक कुमार लोधी वय 44 हा फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावातील रहिवासी होता. तो कर्करोगाने ग्रस्त होता. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कारला त्याचा जीवलग मित्र आनंद गौरव राजपूत हा देखाल आला होता. (Latest Marathi News)

जेव्हा लोक हळूहळू स्मशानभूमीतून परत जाऊ लागले, तेव्हा राजपूतने अचानक जळत्या चितेवर उडी घेतली. युवक गंभीररित्या भाजला होता, त्यामुळे त्याला उपचारासाठी आग्रा येथे आणण्यात आले होते. दुसरीकडे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (Breaking Marathi News)

राजपूतचा मोठा भाऊ कमल सिंग यांनी सांगितले की, दोघांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. दोघेही एकाच शाळेत गेले आणि दोघांनी एकाच दिवशी लग्नही केले. दोघे अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये संगीत वाजवायला जात असत.

मैत्रीचे अनेक उदाहरणांची इतिहासात नोंद आहे. मैत्रीमध्ये आयुष्य पणाला लावणारी देखील अनेक उदाहरणं आहेत. मात्र मित्रांच्या मृत्यूनंतर दु:खात जीव देण्याच्या कृत्याचं समर्थन करता येणार नाही. याला निव्वळ वेडेपणाच म्हणावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT