7th Pay Commission
7th Pay Commission  Saam Tv
देश विदेश

आनंदाची बातमी! या राज्यात कर्मचाऱ्यांचा DA 5 टक्के वाढला, जाणून घ्या

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: केंद्र सरकारने (Central Government) महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर, राज्य सरकारांकडून याबाबत घोषणा केल्या जात आहेत. गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याची घोषणा केली होती. यानंतर रविवारी रात्री उशिरा छत्तीसगड (Chhattisgarh) सरकारनेही कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना भेट दिली.

हे देखील पाहा-

ट्विट करून याबाबत माहिती दिली

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रात्री उशिरा ट्विट (Tweet) करून याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आज आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ जाहीर करतो. हा दर १ मेपासून लागू होणार आहे.

डीए 17 वरून 22 टक्के वाढला

या वाढीनंतर छत्तीसगड सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 22 टक्के झाला आहे. यापूर्वी येथे १७ टक्के डीए मिळत होता. राज्य सरकारच्या ३ टक्के कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. डीए वाढल्यानंतर विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन २५०० ते ८००० रुपयांपर्यंत वाढणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

SCROLL FOR NEXT