Massive flames engulf company premises after alleged act of arson by disgruntled employee. 
देश विदेश

Company Fire: पगार कमी आल्यानं राग अनावर झाला; संतापलेल्या कर्मचाऱ्यानं कंपनीच जाळली

Employee Set Fire Company warehouse: कर्मचारी मालकावर रागावला तर काय होऊ शकतं? हे पाहायचं असेल तर ही बामती पाहाच. संतप्त कर्मचाऱ्यानं पगारावरून कंपनीचं 1800 कोटीचं नुकसान कसं केलंय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

आगीच्या ज्वाळा, आकाशाला भिडणारे धुराचे लोट आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं करणारी ही दृश्य नीट बघा. ही दृश्य एखाद्या नैसर्गिक आपत्तीची नाहीत.तर एका कर्मचाऱ्यांच्या मनात खदखदणाऱ्या रागाचा हा भडका आहे.जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचा संयम सुटतो, तेव्हा तो कोणत्या थराला जाऊ शकतो, याचंच हे एक भीषण उदाहरण आहे.

ही आग लागलीय.एनएफआय इंडस्ट्रीजच्या तब्बल 12 लाख स्क्वेअर फूटावर पसरलेल्या विशाल गोदामात.पण ही आग लागली नव्हती, तर ती लावली गेली होती, ती कशी पाहूयात. एनएफआय इंडस्ट्रीजच्या गोदामात चमेल अब्दुलकरीम हा 29 वर्षीय तरुण काम करत होता. या कंपनीचे गोदाम कॅलिफोर्नियाच्या ओंटारिया येथे आहे.

कामाचा पुरेसा मोबदला मिळत नसल्यानं चमेल अब्दुलकरीम यानं कंपनीच्या गोदामाला आग लावली. आग लावत असतानाचा व्हिडिओ अब्दुलकरीमनं फेसबुक पेजवर शेअर केला. त्यात आरोपीचा चेहरा दिसत नसला तरी तो अब्दुलकरीम असल्याची प्राथमिक माहिती आहे. लायटरच्या मदतीनं आरोपीनं गोदामातील टॉयलेट पेपर रोलला ठिकठिकाणी आग लावली. ज्यामुळे संपूर्ण गोदामातील 1800 कोटींचा माल जळून राख झाला.

दरम्यान गोदामातील आग विझवण्यासाठी 140 हून अधिक जवानांना जीवाची बाजी लावावी लागल्याची माहिती ओंटारियो फायर डिपार्टमेंटचे डेप्युटी चीफ माईक वेडेल यांनी दिलीय. या गोदामात प्रामुख्याने किम्बर्ली-क्लार्क कंपनीचे टॉयलेट पेपर आणि डायपर्सचा साठा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं. त्यामुळे कमी पगारामुळे इतकं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या चमेल अब्दुलकरीमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मात्र एका बाजूला वाढती महागाई आणि दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचं शोषण, या वादातून ही ठिणगी पडल्याची चर्चा आता जगभरात रंगलीय. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करणं आणि कामाचा योग्य मोबदला देण्याची जबाबादारी कंपनीची असली. तरी अब्दुलकरिमची आपला राग व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य होती का? याचा विचारही व्हायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT