Twitter New Logo Changed Saamtv
देश विदेश

Twitter New Logo Design: चिमणी उडाली भूर्रर्र... ट्विटरबाबत एलन मस्कचा मोठा निर्णय

Bye Bye Birdie; Twitter New Logo: इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या आयकॉनिक ब्लू बर्ड लोगोमध्ये बदल केला आहे.

Gangappa Pujari

Elon Musk Renames Twitter To 'X': दोन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्वीटरच्या लोगोमध्ये बदल करण्याची घोषणी केली होती. त्यानुसार ट्विटरच्या अधिकृत हँडलवर (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. यासोबतच नाव बदलून X असे करण्यात आले आहे. मात्र, मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर आता X असा लोगो दिसत आहे. ट्विटरच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनीही ट्विट करून एक्स नावाची माहिती दिली आहे. (Twitter Latest News)

नाव लोगो सगळचं बदललं!

याबाबत अधिक माहिती अशी की, एलन मस्क (Elon Mask) यांनी ट्विटरच्या (Twitter) आयकॉनिक ब्लू बर्ड लोगोमध्ये बदल केला आहे. एलन मस्क यांनी आता ट्विटरचा नवीन लोगो 'X' असेल, असे जाहीर केले आहे. तसेच नवीन लोगोशी संबंधित बदल लवकरच दिसून येईल; असेही ते म्हणाले आहेत. ट्विटरचा निळा रंग आणि त्याच्या लोगोवर असलेले चिमणी ही खास ओळख होती. मात्र आता ट्वीटर पुर्णपणे नवीन ढंगात आले आहे.

आता ट्विटर X नावाने ओळखले जाणार आहे. तसा बदल ट्विटरच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आला आहे. ट्विटरच्या अकाउंटवरील लोगो बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर नावही 'X' करण्यात आलं आहे. ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो (Twitter CEO Linda Yaccarino) यांनीही ट्वीट करत 'X' नावाबाबत माहिती दिली आहे. 

सर्वात मोठा निर्णय...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेला एलन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले. मात्र, नाव आणि लोगो बदलण्याचा निर्णय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय होता. एलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये 'X' या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील X चे वर्चस्व आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP CM : भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर दिल्लीमध्ये हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

Budhwar che Upay: बुधवारच्या दिवशी फक्त करा 'ही' कामं; नशीब चमकून मिळेल पैसा

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Redmi 15 5G Launched: दमदार फीचर्ससह शाओमीच्या स्मार्टफोनची एंट्री, Redmi 15 5G मोबाईल भारतात लाँच, किंमत किती?

Teacher Salary: गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे पगार रखडणार, सरकारने वेतन का अडवले? वाचा

SCROLL FOR NEXT