Elon Musk  Saam TV
देश विदेश

Twitter New Logo : ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र... ट्विटरमध्ये सर्वात मोठा बदल, यूजर्सही झाले अचंबित

Twitter News : सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता.

प्रविण वाकचौरे

Twitter New Logo: ट्विटरची (Twitter) सूत्र इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून कंपनी सतत चर्चेत आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची छाटणी, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपात करणे किंवा ब्लू टिक बाबतचे अनेक निर्णय यामुळे ट्विटर आणि इलॉन मस्क सतत चर्चेत राहिले. आता पुन्हा ट्विटर चर्चेत आलं आहे. कारण इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल केला आहे.

ट्विटरची ओळख असलेला निळा पक्षी (Blue Bird) आता गायब झाला आहे. नव्या बदलानंतर अनेकजण चकित झाले. ट्विटरने 'डॉज' हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागला. ट्विटर हॅक झालं की काय असं अनेकांना वाटत होतं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

ट्विटरच्या लोगो बदलानंतर इलॉन मस्क यांनी मजेशीर ट्वीट केलं आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी ड्रायव्हिंग लायसन्स तपासत आहे. या पोलिसाने ब्लू बर्डचा फोटो हातात धरला आहे. तर गाडीत बसलेला कुत्रा सांगत आहे की 'हे जुने चित्र आहे.'

डोज लोगो काय आहे?

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉज इमेज शिबू इनू आणि डॉजकॉइन ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक गमंत म्हणून ही करन्सी लॉन्च केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT