Funny Elephant Viral Video Instagram/kerala_elephants
देश विदेश

हत्ती महाशयांनाही लागलं मोबाईलचं वेड; मोबाईलमध्ये डोकावणारा हत्ती पाहून हसू आवरणार नाही, पाहा Video

Elephant Viral Video: हानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलने (Mobile) अक्षरशः वेड लावलं आहे. अशात प्राणाही मागे राहिलेले नाहीत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Funny Elephant Viral Video: मोबाईल हा आजच्या जगात आपल्या आयुष्यतील अविभाज्य भाग बनला आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलने (Mobile) अक्षरशः वेड लावलं आहे. अशात प्राणाही मागे राहिलेले नाहीत. केरळमधील एका हत्तीमहाशयांनाही (Elephant) मोबाईलनं पछाडलं आहे. हा हत्ती आपल्या मालकाच्या मोबाईलमध्ये डोकावतानाचा एक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Elephant Viral News)

पाहा व्हिडिओ -

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, तामिळनाडूमधील कुंभकोणम कुंभेश्वरा मंदिराबाहेर एक माहुत आपल. फोनवर स्क्रोल करताना दिसत आहे. त्याचा हत्ती त्याच्या मागे उभा होता आणि तो माहुताच्या फोनमध्येही डोकावायचा प्रयत्न करत होता. हत्तीने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि शेवटी फोनमध्ये डोकावण्यात यश आले.

या इन्स्टाग्राम पोस्टच्या (Viral Video) कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "हत्ती आणि त्याचे माहूत यांच्यातील बंध योग्य पद्धतीने हाताळले जातात तेव्हा ते अनोखे आणि अनमोल असते. जेव्हा हे नाते नैतिकतेने हाताळले जाते, तेव्हा ते आदर आणि प्रेमाचे नाते असते. ज्याचे लवकरच रुपांतर होते. खोल बंध. कुंभकोणम कुंभेश्वर मंदिराचा हत्ती आपल्या माहुतासह फोन पाहत आहे." दरम्यान ऑनलाइन शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि लोक व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "अरे हे खूप क्यूट आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT