shivsena  saam tv
देश विदेश

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं; साम टीव्हीला सूत्रांची माहिती

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Shivsena News : शिवसेना कुणाची? शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार? की शिवसेनेचं चिन्ह गोठावणार? या प्रश्नाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं.. शिवसेनेने (Shivsena) धनुष्यबाणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची कागदपत्र सादर केली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वाद कोर्टात पोहोचला होता. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचला. याचदरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक काही दिवसांवर ठेपल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेऊन महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार होता.

आज, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची धनुष्यबाणाबाबत महत्वाची बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुमारे चार तास बैठक चालली. या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटाला उपलब्ध १९७ पैकी एका चिन्हाची निवड करावी लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला हवं असलेलं ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकराचे कोणतंही चिन्ह सदर यादीत नाही. त्यामुळे दोन्ही गट कोणत्या चिन्हाची निवड करतात हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या वकीलांची बैठक सुरू झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं पर्यायी चिन्ह देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेकडून सोमवारी पर्यायी चिन्ह निवडणूक आयोगाकडे दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT