Karnataka River Shocking  Saam tv
देश विदेश

नदीत पात्रात अचानक पाणी वाढले; बोटीने शिंपले गोळा करायला गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

karnataka kannada river tragedy : नदीत पात्रात अचानक पाणी वाढल्यामुळे शिंपले गोळा करायला गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Vishal Gangurde

कर्नाटकात उत्तर कन्नडच्या एका गावात घडली दुर्घटना

८ जणांचा नदीत बुडून मृत्यू

गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या एका गावातील ८ जणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नदीत शिंपले गोळा करायला गेलेल्या या लोकांवर काळाने घाला घातला. नदी पात्रात अचानक पाणी वाढल्याने बोटीमधील ८ जण पाण्यात बुडाले. यात ७ महिलांचा समावेश असून २ जण अद्याप बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंपले गोळा करायला गेलेले सर्व जण भटकलच्या शिराली भागातील होते. १४ लोकांपैकी एकाच कुटुंबातील ८ सदस्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. बोट नदीत बुडाल्यानंतर गावातील अनेक जण नदीजवळ धावत आले. नदीत बुडालेले जिवंत पाण्यात बाहेर यावेत, यासाठी ग्रामस्थ प्रार्थना करत आहे.

मच्छीमार शिंपले गोळा करण्यासाठी नदी आणि समुद्रात जात असतात. कर्नाटकातील थट्टेहक्कल नदीतही मच्छीमार बोट घेऊन गेले. नदीचा प्रवाह वाढल्यानंतरही मच्छीमार शिंपले गोळा करत होते. पाण्याचा अंदाज आल्याने बोटीत असलेले मच्छीमार पाण्यात बुडाले. त्यातील ८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

मृतांची नावे देखील समोर आले आहे. लक्ष्मी मदेव नायक (३८), लक्ष्मी शिवराम नायक (३९), मालथी जट्टप्पा नायक (३८), मस्तम्मा मंजुनाथ नायक (४३), लक्ष्मी नायक, लक्ष्मी अन्नाप्पा नायक (४४), ज्योती नायक (३७), उमेश मंजुनाथ नायक (४२) अशी मृतांची नावे आहेत.

उत्तरा कन्नडचे जिल्हा आयु्क्त लक्ष्मी प्रिया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'बोटीतून १४ गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, ८ जणांचा पाण्यात मृत्यू झाला आहे. दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफ जवानांना तातडीने बोलवण्यात आलं. एनडीआरएफच्या मदतीने स्थानिक पोलीस शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांयकाळपर्यंत शोध मोहीम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT