A 22-year-old youth collapsed and died of a suspected heart attack while playing cricket with friends on Eid in Bareilly, Uttar Pradesh. Saam tv
देश विदेश

ईदच्या दिवशी काळाचा घाला; क्रिकेट खेळताना २२ वर्षीय मुस्लिम युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

22 Year Old Dies While Playing Cricket In Bareilly: ईदच्या दिवशी उत्तरप्रदेशातील बरेली येथे क्रिकेट खेळताना २२ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Omkar Sonawane

क्रिकेट खेळत असतानाच एका युवकाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, युवकाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला. ईदच्या दिवशी ही दु:खद घटना घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यामध्ये 22 वर्षीय शाकीब दिल्लीमध्ये शिक्षण घेत होता. ईद साजरी करण्यासाठी तो सात दिवसाआधीच आपल्या घरी आला होता. मात्र गावामध्ये क्रिकेट खेळत असताना त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि यामध्ये त्याचे निधन झाले.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाकिब गावातील ईदगाहजवळील मैदानावर आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ट्रकमधून कोळशाचा एक तुकडा खाली पडला अन्..,

दरम्यान, उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात शुक्रवारी रात्री रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना एका ट्रकमधून कोळशाचा मोठा तुकडा पडल्याने एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

बाईकस्वार ट्रकच्या मागे उभे होते.

पोलिसांनी सांगितले की, ट्रकमध्ये कोळसा होता आणि मोटारसायकलवरील दोन तरुण गाडी चालवत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रक एनसीएल खारियाहून दुधिछुआ रेल्वे स्टेशनकडे जात होता. स्टेशन प्रभारी कमल नयन दुबे यांनी सांगितले की, मृताची ओळख अमित कुमार (३०) अशी पटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT