Viral Image Of Egg Saam Tv
देश विदेश

Viral Photo: अंडे का फंडा! सलग तीन वर्षांपासून एका अंड्याचा फोटो करतोय इंस्टाग्रामवर राज्य

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याबाबाद एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका अंड्याचा फोटो पोस्ट केला आहे जो सलग तीन वर्षांपासून इंस्टाग्रामवर राज्य करत आहे.

Shivani Tichkule

इंटरनेट विविध पोस्ट्सने भरलेले आहे जे सहसा आपल्याला आश्चर्यचकित आणि आनंदित करतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) याबाबद एक ट्विट (Tweet) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका अंड्याचा फोटो पोस्ट केला आहे जो सलग तीन वर्षांपासून इंस्टाग्रामवर (Instagram) राज्य करत आहे. या पोस्टमुळे आता अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. (Viral Image Of Egg)

अंड्याचा हा फोटो तीन वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. या फोटोला इंस्टाग्रामवर 55.5 दशलक्ष लाईक्ससह सर्वात जास्त पसंत केलेले फोटो आहे असे ट्विट GWRने केले आहे. त्यांनी अंड्याबद्दलच्या ब्लॉगची लिंकही शेअर केली आहे. मुळात 2019 मध्ये प्रकाशित झालेला हा ब्लॉग, इंस्टाग्रामवर सर्वात जास्त आवडलेली प्रतिमा बनून या विशिष्ट अंड्याच्या फोटोने सर्व रेकॉर्ड मोडले आहे. त्यावेळची विजेती कायली जेनरची जागा घेत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे केवळ एका अंड्याचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. world_record_egg नावाच्या, पेजला कोणतेही फॉलोअर्स नाहीत परंतु 4.8 दशलक्षाहून अधिक नेटिझन्स या पेजला फॉलो करतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT