ED RAID IN DHANBAD: ₹600 CRORE ASSETS SEIZED IN ILLEGAL COAL NETWORK CRACKDOWN saam tv
देश विदेश

600 कोटी रुपयांचं घबाड, 'ब्लॅक डायमंड सिटी'त ईडीची धाड; नोटांच्या बंडलांचा ढिगारा, बघा VIDEO

ED Raid On Illegal Coal Mining Network In Dhanbad Jharkhand: धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा नेटवर्कवर ईडीची मोठी कारवाई; 600 कोटींची मालमत्ता जप्त, 160 कोटींची गुंतवणूक गोठवली आणि कोटींची रोख रक्कम हस्तगत.

Omkar Sonawane

झारखंडमधील धनबाद येथे बेकायदेशीर कोळसा नेटवर्कके ED ने मोठी कारवाई केली असून 30 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत कोळसा व्यापारी आणि काही बाहेरच्या कंत्राटदारांचा समावेश होता. या कारवाईदरम्यान ED ने तब्बल 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केल्याचे संगितले आहे. तसेच 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंडचे गुंतवणूक खाती गोठवण्यात आले असून 1.02 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांची झोनच्या ED पथकाने धनबादमधील सरायढेला, कतरास, झरीया आणि बँक मोअर या भागांमध्ये छापे टाकले. या कारवाईत BCCL चे बाहेरील कंत्राटदार लाल बाबू सिंह आणि कोळसा व्यापारी अनिल गोयल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांचा समावेश होता. बेकायदेशीर कोळसा उत्खनन, खंडणी वसूली आणि मनी लॉंन्डरिंग प्रकरणाच्या तपासाचा हा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

तपासादरम्यान 200 हून अधिक स्थावर मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये भूखंड, व्यावसायिक संकुले आणि खाण शेअर्सचा समावेश असून, या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे 500 ते 600 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. याशिवाय अनेक बँक खात्यांशी संबंधित डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

धनबादला कोळशाच्या प्रचंड साठ्यामुळे भारताचे ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर खाणकाम आणि कोळसा माफियांच्या कारवायांचे आरोप होत आले आहेत. 1970 च्या दशकात भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) चे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर येथे टोळीयुद्ध आणि कोळसा माफियांचे जाळे वाढल्याचे चित्र होते. अलीकडच्या काळात कुख्यात गुंडांच्या जागी कंत्राटदारांनी ताबा घेतला असून, संघटित पद्धतीने बेकायदेशीर उत्खनन आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेसमोर शिवसेना शिंदे गटाचं मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन

Delhi Protest: आंदोलनातील जखमींवर उपचार करा, पेलेट गन वापरण्याची SOP काय? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले

शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वात मोठा धक्का; आमदारकी रद्द होणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने खळबळ

'तोंडावर गोड पण मागे कडू' या 5 लोकांपासून राहा दोन हात लांब

Vitamin deficiency: पावसाळ्यात शरीराला सतत खाज येतेय? 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते

SCROLL FOR NEXT