Earthquake in Ladakh Saam Tv
देश विदेश

Earthquake in Ladakh: भूकंपाच्या धक्क्यांनी कारगिल हादरलं; ५.२ रिक्टर स्केल तीव्रतेची नोंद

Ladakh Earthquake : काश्मीरच्या उत्तर भागात भूकंपाच्या जोरदार धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपाची खोली १० किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Bharat Jadhav

Earthquake in Ladakh Kargil:

लडाखमध्ये असलेल्या कारगिलमध्ये रात्री ९.३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जीवित व वित्तहानी झाल्याचे अद्याप कोणतेच वृत्त नाही. परंतु भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. शुक्रवारी श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये ३.९ तीव्रतेचे धक्के जाणवले होते.(Latest News)

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या काळात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ मोजण्यात आली होती. भूकंपाची खोली ५ किमी होती. या भूकंपामुळे कोणतेच नुकसान झाले नाही. भूकंपाच्या दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीर अत्यंत संवेदनशील मानले जाते, अशी माहिती सिस्मोलॉजी डिपार्टमेंटने दिलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरातमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील कच्छमध्ये आज ( १ फेब्रुवारी) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.१ 1 इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून १५ किलोमीटर खाली होता. यापूर्वी रविवारी २८ जानेवारीच्या संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील भोरूचजवळ होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.० इतकी मोजली गेली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT