Earthquake  Saam Tv
देश विदेश

Earthquake In Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; फरिदाबाद होतं केंद्र

Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये परत एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.

Bharat Jadhav

Earthquake in Delhi-NCR:

दिल्ली-एनसीआरमध्ये परत एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानी दिल्लीसह आसपासच्या शहरात ३.१ रिक्टल स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. फरीदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र फरिदाबाद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के ४ वाजून ८ मिनिटांनी जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकं घराबाहेर पडले.

राजधानी दिल्लीमध्ये आठवड्यातून दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी दिल्ली-एनसीआरमध्ये ३ ऑक्टोबर रोजी भूकंप आला होता. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकं घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले होते.दुपारी०२. ५१ मिनिटांनी वाजता भूकंपाचे धक्के बसले होते. त्याचदिवशी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी होती.

दुपारी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, एका तासाच्या आत देशात तीनवेळा भूकंपाचे धक्के जाणवले. देशाच्या पश्चिमी भागात ६.३ आणि ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले होते. दरम्यान आजच अफगाणिस्तानमध्ये भूकंप आला होता. अफगाणितास्तानमध्ये ६.५ तीव्रतेचा भूकंप आला होता. भूकंपाचे केंद्रस्थान जमिनीच्या दहा किमी अंतरावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT