HUNGARY BUS CRASH: 12 PASSENGERS KILLED, SEVERAL INJURED saam tv
देश विदेश

भीषण अपघात! बस उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Horrific Bus Crash in Hungary: हंगेरीमध्ये पोलंडच्या प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावरून बस खड्ड्यात कोसळून पलटी झाल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Omkar Sonawane

पोलंडची राजधानी हंगेरीमध्ये रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. हायवेवरून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात बस कोसळून पलटी झाल्याने या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे 1 वाजता हा अपघात झाला. हंगेरीची राजधानी बुडापेस्टपासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बस रस्त्यावरून घसरून खडड्यात कोसळल्यानंतर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्राथमिक तपासात ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आपघातात 10 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलंडचे पंतप्रधान पीटर मॅग्यार यांनी सोशल मीडियावरून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत घटनास्थळी मदत आणि बचावकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

दरम्यान, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नवरोकी आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकोरस्की यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पोलिस वाणिज्य दूतावासाची टीम हंगेरीच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune BJP : पुण्यात भाजपचा 'ट्रिपल स्ट्रोक'! निवडणुका नसतानाही तिघांचा पक्षात प्रवेश

Heart Attack : महिलांनो! 'या' वयानंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ३ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; BKC आणि सूरत स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

Maharashtra News Live Update: मंत्री येणार म्हणून घाईघाईत काम, चाकण तळेगाव रोडवर एका तासातच कामाचा बोजवारा

LPG e-KYC Deadline: LPG e-KYC ची शेवटची तारिख डेटलाइन वाढणार का?

SCROLL FOR NEXT