Two Group Clash Update  Saam tv
देश विदेश

Two Group Clash : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात राडा; वाहन आणि दुकानांची तोडफोड, पोलिस आयुक्तांसहित अनेक जखमी

Two Group Clash in Odisha : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून ओडिशामध्ये दोन गटात राडा झाला. दोन्ही गटातील तरुणांनी वाहन आणि दुकानांची तोडफोड केलीये.

Vishal Gangurde

ओडिशाच्या कटकमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान राडा

वाहनं, दुकानं यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड

पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि नागरिक जखमी

इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद.

ओडिशाच्या कटकमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. मूर्ती विसर्जनावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दोन्ही गटातील लोकांनी परिसरातील गाड्या, दुकानांची तोडफोड केली. दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गट भिडल्यानंतर झालेल्या हिंसेत पोलीस अधिकारी देखील जखमी झाले.

दोन गटात राडा झाल्यानंतर परिसरात २४ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा ही रविवारी ७ वाजेपासून ते ६ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहील. या राड्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही गटातील तरुणांनी परिसरात वाहनांचं प्रचंड नुकसान केलंय. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. त्यांना अश्रूधूरांच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला.

बीजू जनता दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कटक शहरातील दोन गटात राडा झाला. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी शहरात शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सहायक अग्निशमन अधिकारी संजीव कुमार बेहरा यांनी सांगितलं की, गौरीशंकर पार्कात काही समाजकंटाकांनी ८-१० जागांवर आग लावली. आम्ही या आगीवर नियंत्रण मिळवलं. दोन्ही गटातील तरुणांनी आमच्यावर दगडफेक केली. शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

ओडिशा सराकराने कटक शहारात २४ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. इंटरनेट सेवा बंद झाल्याने व्हाट्सअॅप, फेसबुक, एक्स आणि कोणत्याही प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. अफवा पसरू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरात अफवा पसरू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करणे गरजेचे आहे. काही संवेदनशील भागात पोलिसांचा फौजफाटा अधिक प्रमाणात तैनात करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT