दुबईच्या गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये २४ कॅरेट गोल्ड वॉकवे उभारण्याची योजना
हा मार्ग २०२६ च्या अखेरपर्यंत पर्यटकांसाठी सुरू
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट हा सोने आणि दागिन्यांच्या व्यापाराचा महत्त्वाचा केंद्रबिंदू
आजवर तुम्ही सोन्याचे दागिने आणि मूर्ती पाहिल्या असतील. मात्र, आता चक्क सोन्याचा रस्ता बनवला जातोय. होय, 24 कॅरेट सोन्याचा रस्ता. दुबईत पूर्णपणे सोन्याचा रस्ता बनवला जातोय. त्यामुळे लवकरच दुबईत पर्यटकांना सोन्याच्या रस्त्यावरून चालता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा जगातील पहिला आणि सर्वात मोठा सोन्याचा मार्ग असणार आहे. दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट जगभरात सोने आणि दागिन्यांच्या व्यापाराचे मोठे केंद्र म्हणून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतंय. त्याचाच भाग म्हणून आता चक्क सोन्याचा रस्ता बनवतंय.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट सोने आणि दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच पर्यटकांसाठी विकसित केला जातोय. गोल्ड वॉकवे हा याच योजनेचा एक भाग आहे. गोल्ड वॉकवेच्या माध्यमातून दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट एक खास पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार आहे.
दुबई आधीपासूनच सोन्याचा व्यापार आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच आता जगाला आपल्या भव्यदिव्य आणि विलासी प्रकल्पांनी नेहमीच थक्क करणाऱ्या दुबईनं आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. त्यामुळे आगामी काळात दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांना गोल्ड वॉकवे मुख्य आकर्षण असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.