Nagin Dance  Video Viral
Nagin Dance Video Viral  Saam TV
देश विदेश

Funny Video : याला कुणीतरी आवरा रे! भर रस्त्यात मद्यपीचा नागिन डान्स, व्हिडीओ Viral

Satish Daud-Patil

Nagin Dance Video Viral : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन अंतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. तसं पाहता दारूचे व्यसन हे शरीरासाठी हानिकारकच असते. दारू लोकांचं आयुष्य खराब करते. त्यामुळे दारूपासून लांबच राहा असा सल्ला अनेकजण देतात. मात्र तरी देखील बरीच लोकं दारू ढोसतातच. बरं दारू पिल्यानंतरही त्यांना चैन पडत नाही, दारूच्या नशेत आपण काय करतोय याचे जराही त्यांना भान नसते. अशाच एका मद्यपी व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Funny Dance Video)

या व्हिडीओत एक व्यक्ती दारूच्या नशेत भररस्त्यात चक्क नागिन डान्स (Dance Video) करताना दिसतोय. या व्यक्तीने इतकी दारू ढोसलीये की आपण दारूच्या नशेत काय करतोय याचे जराही भान त्याला राहिलेलं नाही. भररस्त्यात वाहने अडवत तो नागिण डान्स करताना दिसतोय. लक्षवेधी बाब म्हणजे डान्स करता-करता तो ब्रूस ली प्रमाणे कुंग-फू कराटे सुद्धा करत आहे. पण तो ज्या पद्धतीने हे करतोय ते दृश्य पाहून तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही.

व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती इतकी प्रचंड दारू प्यायला आहे की त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नाहीये. मात्र, तरी देखील तो रस्त्याच्या मधोमध उभं राहून नागिन डान्स करत आहे. दरम्यान, दारूच्या नशेत टुल्ल झालेल्या या व्यक्तीला आवरण्यासाठी दुसरा व्यक्ती तेथे येतो. त्यावेळी दोघांची ती रंगलेली जुगलबंदी पाहून अनेकांना हसू आवरत नाही. (Drank Man Viral Video)

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्यापही कळलं नाही. पण हा व्हिडीओ @NagpurKaRajini नामक ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दारूच्या नशेत टुल्ल झालेल्या व्यक्तीचा भररस्त्यात नागिन डान्स बघून नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ शेकडो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून हे योगा डेचं सेलिब्रेशन तर नाही ना? अशा आशयाच्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT