Andhra Pradesh News  saam tv
देश विदेश

आंध्र प्रदेशमध्ये अचानक वाढली गाढवाच्या मांसाची मागणी; समोर आली धक्कादायक माहिती

आंध्रप्रदेशमध्ये अचानक गाढवांच्या मांसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Andhra Pradesh News : भारतात बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्यांच्या मटणाचा (Meat) अन्नात लोकांकडून मोठ्या प्रमाणात सामावेश केला जातो. मात्र, आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) अचानक गाढवांच्या मांसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गाढवांच्या मांसाच्या सेवनामुळे व्यक्तीच्या लैंगिक क्षमता वाढते, असा भ्रम लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आंध्र प्रदेशच्या लोकांमध्ये गाढवांच्या मांसाची मागणी वाढल्यामुळे आरोग्य तज्ञांमध्ये चिंता वाढली आहे. गाढवांच्या मांसाची विक्री अवैधरित्या वाढली असल्यामुळे पोलिसांकडून मोठ्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

आंध्र प्रदेशमध्ये गाढवांच्या मांसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गाढवाची शिकार करणे आणि गाढवाच्या मांसाचे सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, समाजात २०१० च्या सालापर्यंत गाढवाचा मांसाचा सामावेश अन्नात केला जात होता.

दरम्यान, गाढवाच्या मटणाचा आहारात सामावेश केल्यामुळे व्यक्तीच्या लैंगिक क्षमतेत वाढ होते असा भ्रम आंध्रप्रदेशच्या लोकांमध्ये पसरला आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या वेगवेगळ्या भागात गाढवाच्या मांसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंध्रप्रदेशच्या कृष्णा, गुंटूर, पश्चिम गोदावरी, प्रकाशम आणि बापतला या भागात गाढवाच्या मांसाची वाढली आहे.

गाढवाच्या मटणाच्या आहाराविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रम पसरला आहे. गाढवाच्या मांसाचे सेवन केल्यामुळे लैंगिक क्षमता वाढण्यासहित पाठदुखी, दमा, श्वासाविषयी समस्या बऱ्या होतात असाही भ्रम लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

गाढवाच्या मांसाचे सेवन करणे आहे नुकसानकारक

आंध्र विद्यापीठाच्या 'फूड ऐंड न्यूट्रिशन विभागा'चे प्राध्यापक सुधाकार यांनी गाढवाच्या मांसाचे सेवन केल्याने होण्याऱ्या आरोग्यदायी फायद्याचे खंडण केले आहे. गाढवाच्या मांसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला फायदा होतो याबाबत कोणतेही संशोधन समोर आलेले नाही. त्यामुळे गाढवाच्या मटणाच्या सेवनाने फायदा होतो हे खोटे आहे, असेही प्राध्यापक सुधाकार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT