Rajasthan Temple Saam Tv News
देश विदेश

ना शिर्डी- ना तिरूपती, 'या' मंदिरात २५ कोटींहून अधिक रूपयांचं दान, अडीच किलो सोनं आणि..

Donation to Rajasthan’s Sanwalia Seth Temple: कृष्ण धाम सांवलिया सेठ मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. लोक आपल्या श्रद्धेनुसार देवाला नैवेद्य अर्पण करतात. तर काही जण मंदिराच्या दानपेटीत ऐच्छिक दान करतात.

Bhagyashree Kamble

राजस्थानच्या चित्तोडगडमधील कृष्ण धाम सांवलिया सेठ मंदिर हे अत्यंत लोकप्रिय आहे. कृष्ण धाम सांवलिया सेठ मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. लोक आपल्या श्रद्धेनुसार देवाला नैवेद्य अर्पण करतात. तर काही जण मंदिराच्या दानपेटीत ऐच्छिक दान करतात. दानपेटीत काहीजण पैसे तर काही जण सोने - चांदी किंवा मौल्यवान वस्तू दान करतात. मात्र, महिन्याच्या शेवटी हे दान इतकं होतं की मोजण्यासाठी बरेच दिवस लागतात. शिवाय या कामासाठी अनेक लोक असल्याचं पाहायला मिळतं.

सांवलिया सेठ मंदिरात सहाव्या दिवशी आलेले दान मोजण्यात आले आहे. ज्यामध्ये २४ कोटी ९१ लाख रूपयांहून अधिक रक्कम आली आहे. तसेच अडीच किलोहून अधिक सोने आणि सुमारे १८८ किलोहून अधिक चांदी भक्तांकडून दान करण्यात आली आहे. मंदिरात आजपर्यंतचा सर्वात मोठा दानाचा विक्रम आहे. ज्यामुळे शिर्डी आणि तिरूपतीपेक्षा कृष्ण धाम सांवलिया सेठ मंदिराची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दानपेटीत २५ कोटी ६१ लाख ६७ हजार ५८१ रूपये रोख, ३० लाख २७ हजार ४२७ रूपये ऑनलाईन दान, तसेच २ किलो २९० ग्रॅम सोनं आणि २८० ग्रॅम ५०० मिलीग्रॅम सोनं भक्तांकडून भेट कक्षात दान करण्यात आलं आहे. यासह ५८ किलो ९०० ग्रॅम चांदी दान करण्यात आलं असून, १२९ चांदी भेट म्हणून मिळाली आहे.

याआधी कृष्णा धाम सांवलिया सेठ मंदिराची दानपेटी ५ जून रोजी उघडण्यात आली होती. चार फेरींमध्ये कोटीहून अधिक रक्कम दान झाल्याची माहिती आहे. तसेच चार फेऱ्यांनंतर १३. ४८ कोटी रूपये भक्तांकडून दान मिळाल्याची माहिती आहे. तर ऑनलाइन आणि इतर माध्यमातून ३.५५ कोटी रूपये मिळाले. म्हणजेच एकूण १७.१३ कोटी मिळाले होते. रकमेसह १.८४ किलो सोनं मिळालं. यामध्ये दागिने आणि बिस्किटं इत्यादींचाही समावेश आहे.

तर, एका भक्ताने भक्तीभावाने १०० ग्रॅमची १५ बिस्कटं अर्पण केली होती. तसेच चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात मिळाले होते. कृष्णा धाम सांवलिया सेठ मंदिरातील दानपेटीत ६८ किलो चांदी मिळाली होती. दानपेटी उघडल्यानंतर ही रक्कम मोजण्यासाठी अनेक लोक असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lawyer-Judge verbal spat: डोन्ट क्रॉस द लिमिट! वकिलानं न्यायाधीशांना रोखठोक सुनावलं, हायकोर्टातच ड्रामा

Eyeliner Tips: आयलायनर लावण्यासाठी सोप्या टिप्स; डोळ्यांना द्या परफेक्ट लूक

Prarthana Behere Photos: कपाळी टिकली अन् नाकात नथनी, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा सुंदर साज

Mumbai Crime : मुंबईत २० हून अधिक घरे, शेकडो भक्त; किन्नरांच्या गुरुला अटक, बांग्लादेश कनेक्शन उघड

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन.

SCROLL FOR NEXT