iran vs israel america attack  Saam tv
देश विदेश

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

iran vs israel america attack : इराण आणि अमेरिका - इस्त्रायलमधील युद्धात अनेक देश ओढले जातायत. हे युद्ध चार आठवडे सुरू राहण्याचा अंदाज अमेरिकेकडून वर्तवण्यात आलाय. त्यातच आता ट्रम्प यांच्या एका विधानानं जगाची झोप उडालीये...इराण खरचं बेचिराख होणार का? ट्रम्प यांनी काय इशारा दिलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणनं आक्रमक होत अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलंय. साडे दहा हजार किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेला थेट लक्ष करण्यापेक्षा इराणनं आखातातील अमेरिकी तळ उद्धवस्त करुन बलाढ्य अमेरिकेला दुर्बळ करण्याची युद्धनिती अंमलात आणली आणि धडाधड अमेरिकेची तळं उधवस्त केलीये. सौदी अरेबिया आणि बहरीनमधील हवाई तळ बेचिराख करुन अमेरिकेला हम भी किसीसे कम नहीं हा जळजळीत इशारा दिलाय. आखातातील अमेरिकेचे लष्करी तळांवर आगडोंब उसळल्यानंतर आता अमेरिकेच्या मित्र देशांनी या युद्धात इराणविरोधात कारवाई सुरु केलीये.

सौदीने इराणचे आठ ड्रोन केले उद्धवस्त

कतारकडून इराणची क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट

युएईतही इराणी क्षेपणास्त्रांवर पाडले

इराण विरोधात अरब देशही आक्रमक

खामेनेईंच्या खात्म्यानंतर इराण ईरेला पेटला आणि आखातातील आण्विक केंद्रांचा विचार न करता अंधाधुंद लष्करी कारवाई करण्यात आली. शाहेद-136 आणि ड्रोनद्वारे केलेल्या कारवाईत अमेरिकनं अधिकाऱ्यांच्या निवासाला ही टार्गेट करण्यात आल्यानंतर आखाती राष्ट्र आता स्वसंरक्षासाठी युद्ध मैदानात उतरले. तर अमेरिकेनं इराण विरोधात अधिक आक्रमक आणि सुक्ष्म प्लॅनिंग केल्याची माहिती समोर आलीये.

गुप्त माहिती मिळवण्यासाठी CIA ग्राऊंड झिरोवर

खामेनेईंना ट्रॅक करण्यासाठी इराणचे CCTV हॅक

महिन्याभर युद्ध करण्यास अमेरिका सक्षम

मित्रराष्ट्रांच्या बचावासाठी आणि आपली पथ राखण्यासाठी अमेरिकेनं आता आणखीन आक्रमक होत युद्ध लढण्याची तयारी केलीये. प्रत्युत्तर काय असेल हे तुम्हाला लवकरच कळेल अशी उघडउघड धमकी देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हात करण्याचा निर्धार पक्का करत इराणला जगाच्या नकाशावरुन पुसण्याचा प्लॅन फिक्स केलाय का आणि आजची रात्र इराणसाठी वैऱ्याची की अमेरिकेसाठी हे पाहणं महत्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT