Donald Trump NEWS Saam tv
देश विदेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; व्हाईट हाऊस परिसरात २० राऊंड फायर, मुख्य हल्लेखोराचा खात्मा

White House Washington DC shooting : व्हाईट हाऊस परिसरात अचानक झालेल्या भीषण गोळीबारामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून सुरक्षा रक्षकांनी मुख्य हल्लेखोराला ठार केले आहे.

Namdeo Kumbhar

Donald Trump Latest News : अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये (White House)असतानाच अचानक परिसरात भीषण गोळीबार झाला. हल्लेखोराने तब्बल २० राऊंड फायर केल्या. या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराचा खात्मा केला असून त्याचा फोटो समोर आला आहे.

सुरक्षा रक्षकांकडून चोख प्रत्युत्तर, संशयित ठार

व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार सुरू होताच तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ प्रत्युत्तर फायरिंग केली. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत मुख्य संशयित हल्लेखोर ठार झाला आहे. या गोळीबारात अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संशयित हल्लेखोराचा फोटोही आता समोर आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित; सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर

गोळीबाराच्या या भीषण घटनेवेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या आतच होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले असून ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर व्हाईट हाऊसची सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक करण्यात आली. व्हाइट हाऊसमधील संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

महिनाभरात दुसरी घटना

धक्कादायक म्हणजे, गेल्या महिनाभरात व्हाईट हाऊसवरील गोळीबाराची ही दुसरी मोठी घटना घडली आहे. त्यामुळे अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास आता अमेरिकन गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रण

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये अखेर उलगडणार सर्वात मोठं रहस्य; सायलीच आहे खरी तन्वी, मधुभाऊंनी दिला इशारा!

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Chapati Recipe : पावसाळ्यात चपाती थंड झाल्यावर कडक होते? फॉलो करा 'ही' रेसिपी, मिळतील मऊ-लुसलुशीत पोळ्या

SCROLL FOR NEXT