Donald Trump Saam Tv
देश विदेश

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला धक्का, परस्पर शुल्क लागू होणार; थेट तारीखच जाहीर केली

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेला संबोधित करताना आपल्या भाषणामध्ये दोन वेळा भारताचा उल्लेख केला आणि परस्पर शुल्क लागू होणार असल्याची घोषणा केली. कधीपासून हे परस्पर शुल्क लागू होणार त्याची तारीख देखील त्यांनी जाहीर केली.

Priya More

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. जगात सर्वात मोठे व्यापार युद्ध सुरू असताना त्यांनी हे घोषणा केल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे. बुधवारी अमेरिकेतील संसदेला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर शुल्क लादण्याबाबत मोठी घोषणा केली. २ एप्रिल २०२५ पासून भारत, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांवर रेसिप्रोकल टैरिफ म्हणजे परस्पर शुल्क लागू केले जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेला संबोधित करताना आपल्या भाषणामध्ये दोन वेळा भारताचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, चीन, मॅक्सिको, कॅनडासह भारत हे देश अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात कर लादतो. जे योग्य नाही. यावेळी ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅरिफ लागू होण्याची तारीख देखील जाहीर केली. २ एप्रिलपासून परस्पर कर लागू केला जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात भारताबद्दल सांगितले की, दोनदा भारताचे नाव घेताना म्हटले की भारत आमच्यावर १०० टक्के कर लादतो. हे अजिबात बरोबर नाही. टॅरिफ वॉरची औपचारिक घोषणा करताना त्यांनी सांगितले की, आता जो देश अमेरिकेवर टॅरिफ लादेल. त्या देशावर देखील टॅरिफ लादला जाईल.

ट्रम्प यांनी अमेरिकेवर कर लादणाऱ्या काही देशांची नावेही सांगितली. ते म्हणाले की, सरासरी युरोपियन युनियन, चीन, ब्राझिल, भारत, मेक्सिको आणि कॅनडा आपल्यावर कर लादतात. तुम्ही याबद्दल ऐकले आहे का? असंख्य इतर देश आपल्याकडून आकारलेल्या शुल्कापेक्षा खूप जास्त शुल्क आकारतात. हे खूप अन्याय आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, '२ एप्रिलपासून अमेरिका देखील त्यावर शुल्क लादणाऱ्या देशांवर समान शुल्क लादेल. कमी नाही आणि जास्तही नाही. १ एप्रिल रोजी परस्पर शुल्क लागू करण्याची आमची योजना होती, पण ते एप्रिल फुल डेशी जोडले जाऊ नये असे मला वाटत होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT