Viral Video Saam TV
देश विदेश

Dog and Snake Viral Video : चित्तथरारक! सापाने दंश करताच कुत्र्याने त्याला कचाकच चावलं; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...

Animal Fighting Viral Video: एक कुत्रा आणि साप या दोघांची तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे.

Ruchika Jadhav

Viral Videos : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडिओ पहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ थेट काळजात धडकी भरवणारे असतात. साप, नाग, अजगर असे सरपटणारे विषारी प्राणी खाण्याच्या शोधत काहीवेळा मानवी वस्तीपर्यंत पोहचतात. यामुळे नागरिक इतके भयभीत होतात की, त्या सापाचा विचार न करता ते त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. (Latest Dog and snake fighting)

खरं तर जेव्हा साप मानवी वस्तीत येतात तेव्हा एवढा गोंधळ पाहून ते देखील भयभीत होतात आणि सैरभैर पळू लागतात. ते स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि माणसं सापाने आपल्याला हानी पोहचवू नये असा विचार करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यामध्ये एका व्यक्तीने सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलं आहे.

कुत्रा नेहमीच आपल्या मालकाचे रक्षण करतो. अशात सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कुत्रा आणि साप या दोघांची तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे. साप आणि कुत्रा दोघेही एकमेकांवर तुटून पडलेत. दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला साप समोर येतो. कुत्रा सापाला पाहून त्याच्यावर जोरजोरात भुंकू लागतो. कुत्र्याच्या भुंकन्याने साप खूप घाबरतो. आपला जीव वाचवण्यासाठी तो फणा काढतो.

कुत्रा त्याच्या भोवती फिरत भुंकत असतो. तितक्यात साप त्याला दंश करतो. साप पुढे येताच कुत्रा मागे पाळतो. नंतर तो पुन्हा सापावर भुंकूलागतो. हा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की, साप जेव्हा दंश करतो तेव्हा कुत्र्याची दया येत आहे. कारण सापाच्या दांशने भल्याभल्यांचं वरचं तिकीट पक्का झालं आहे. सापाच्या दांशाने कुत्रा आणखी पिसाळतो. तो सापाला पुन्हा एकदा चवण्यासाठी त्याच्यावर भुंकतो. त्यामुळे परत एकदा साप त्याला दंश करतो. सापाने दोन तीन वेळा दंश केल्यावर कुत्रा खूप चिडतो आणि सापाचा चांगलाच चावा घेतो. तो सापाला आपल्या दातांनी पकडुन ठेवतो. साप अगदी तरफडतो आणि कुत्र्याला दंश करत राहतो.

साप आणि कुत्र्याच्या जुगलबंदीचा हा व्हिडिओ रोनाल्ड या युजरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये साप आणि कुत्रा या दोघांच्याही जीवाला धोका असल्याचं दिसत आहे. मात्र तरी देखील माणूस स्वतः साठी आपल्या कुत्र्याच्या जीवाशी देखील खेळताना दिसत आहे. सध्या हा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात रंगली म्हशींची सौंदर्य स्पर्धा

दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

Cham Cham Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली मऊ आणि रसाळ चमचम मिठाई; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

SCROLL FOR NEXT